महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

वनिता कांबळे | Updated: Nov 17, 2024, 09:53 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद!  शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? title=

Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही शिवसेना कुणाची हा वाद पुन्हा रंगलाय. शिवसेनेचं नाव दुस-याला देण्याचा अधिकार कोणाचाही मानूच शकत नाही आणि तो कुणालाही नाही. अगदी निवडणूक आयोगालाही सुद्धा नाही,असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलाय.शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलंय. त्यामुळे माझी शिवसेना हीच शिवसेना असल्याचं विधान टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंनी केलंय.

हे देखीाल वाचा...भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं

उद्धव ठाकरेंनी माझी शिवसेना हीच शिवसेना असल्याचं वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.  पक्ष,चिन्ह काय असतं, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं.  उद्धव ठाकरेंकडं 14 तर, शिवसेनेकडं 50 आमदार आहेत. लोकशाहीत ज्याच्याकडं बहुमत असतं त्याच्याकडं पक्ष असतो, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलीय

हे देखील वाचा... राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करून 40 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून वाद सुरू आहे हा वाद आता न्यायालयापर्यंत पोहचलाय.  2022 मध्ये शिवसेनेत फूट फडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू झाला होता. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं शिंदेच्या गटाला मान्यता दिली. तसेच धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाला देण्यात आलं.  तसेच दोन्ही गटाला खरी शिवसेना कुणाची याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची मुभा देण्यात आलीय.