नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'

Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2024, 05:51 PM IST
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...' title=

Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं. त्या दिवशी तर मी शांत होतो. पण आचारसंहिता संपताच. महायुतीचा शपथविधी होताच मी महाराष्ट्र सरकारसह बसून देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण कशी होईल यासाठी काम करेन असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"गेल्या 3 महिन्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राला सर्व परदेशी गुंतवणूक योजनांमध्ये प्राथमिकता दिली जात आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन योजना, ग्रीन एनर्जी आणि सोलार प्रोजेक्ट, स्टील प्रोजेक्ट आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात हे प्रोजेक्ट सुरु केले जात आहेत. महाराष्ट्रात अनेक नवे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'

 

पुढे ते म्हणाले, "भारतातील सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात तयार होत आहे. पायाभूत सुविधांच्या नवा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. मी पायाभरणीसाठी आलो होतो तेव्हा आमच्या देवेंद्रजींनी लोकांमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती. हिंदुस्थानमधील सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे. मोदीजी इतकं करत आहात, हजारो कोटी लावत आहात तर तिथे एक विमानतळही तयार करा असं ते सांगत होते. त्या दिवशी तर मी शांत होतो. पण आचारसंहिता संपताच, महायुतीचा शपथविधी होताच मी महाराष्ट्र सरकारसह बसून देवेंद्रजींची इच्छा पूर्ण कशी होईल यासाठी काम करेन".

"महाराष्ट्राकडून जेव्हा काही मागितले तेव्हा राज्याच्या जनतेने खुलेपणाने आशीर्वाद दिला आहे. मागच्या विधानसभेत येऊन गेलो त्यावेळी राज्याच्या जनतेने भाजपाला विजयी केले होते. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला जनतेचा आशीर्वाद पाहिजे, विश्वास देतो गेल्या अडीच वर्षात जो विकासाला गती मिळाली आहे तिला थांबू दिले जाणार नाही. येत्या 50 वर्षात राज्याला सुशासन महायुती देऊ शकते," असंही नरेंद्र मोदी म्हणाले. 

"महाआघाडीच्या गाडीला ना ड्राइवर, ना पाय आहेत. लोकांना लुटणारे महाआघाडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारचे अडीच वर्षं पहिले आहेत. आधी सरकार लुटले आणि शेवटी लोकांना लुटायला लागले होते. आघाडी सत्तेत आल्यावर सर्व विकासकामं थाबवली. त्या सर्व योजना थांबावल्या ज्याने राज्याचे भविष्यात उज्वल होणार होते. युतीने विकासाचे नवे आयम उभे केले, विकासाचा भरोसा मिळाला आहे," असंही त्यांनी सांगितलं.