नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार?

Nanded Politics:  मतदारसंघातील मराठ्यासह दलित आणि मुस्लिम जनतेनं कायम साथ दिलीय.. त्यामुळे जनता पुन्हा सोबत राहणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2024, 08:30 PM IST
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार? title=
अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा

सतीश मोहिते, झी 24 तास नांदेड: नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभेची यंदाची निवडणूक अशोक चव्हाणांसाठी सोपी नाहीये.. कारण एकेकाळी अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात त्यांची परीक्षा आहे.. त्यांची मुलगी श्रीजयाला विधानसभेवर निवडून आणणं त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघावर राज्याचं लक्ष असणार आहे. कारण यंदा  भाजपनं अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेची उमेदवारी दिलीय.. त्यामुळे भोकर मतदारसंघात अशोक चव्हाणा प्रतिष्ठा पणाला लागलीये. चव्हाण कुटुंबियांचा राजकीय वारसा पुढे चालवणार असल्याचं श्रीजया चव्हाण म्हणाल्यात.

जनता पुन्हा सोबत राहणार?

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा परंपरागत मतदार नेहमीच चव्हाणांच्या पाठीमागे राहिला. मतदारसंघातील मराठ्यासह दलित आणि मुस्लिम जनतेनं कायम साथ दिलीय.. त्यामुळे जनता पुन्हा सोबत राहणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

भोकरच्या जनतेची नेहमीच काँग्रेसला साथ 

अशोक चव्हाण जे सांगतात त्यात तेवढंसं तथ्य नाही. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसचा विजय झाला तर भाजपच्या खासदाराचा पराभव झाला होता.  भोकरच्या जनतेनं नेहमीच काँग्रेसला साथ दिलीय.. अशोक चव्हाण यांनी आता विचारधारा बदलली आहे. त्यामुळे त्यांना आता जनता साथ देणार नसल्याचा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय.

विधानसभा निवडणूक चव्हाण कुटुबियांसाठी सोपी नाही

2019च्या लोकसभेत नांदेडच्या जनतेनं अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता.. तसेच 2024 लोकसभेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण सोबत असतांनाही भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय.. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चव्हाण कुटुबियांसाठी सोपी नसल्याचं चित्र आहे.

कुठलीच रिस्क नको म्हणून पुण्यात भाजपचा सेफ गेम!

धानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुण्यात विद्यमान तीन आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलीय. भाजपनं सुरक्षित मतदारसंघातील अपेक्षित उमेदवार जाहीर केलेत. कसब्यात ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार द्यायचा, खडकवासला आणि वडगावशेरीपैकी कोणत्या मतदारसंघाची मित्रपक्षाबरोबर अदलाबदली करायची. या पेचामुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडलीय.कोथरूड,शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघात इतर  इच्छुकांनी उमेदवारीसाठी दंड थोपटलेले असताना पक्षांनं यावेळी कुठलीच रिस्क नको म्हणत विद्यमानांना उमेदवारी दिलीय.  कोथरूडमधून विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना सलग दुस-यांदा उमेदवारी देण्यात आलीय. शिवाजीनगरमधून विद्यमान आमदार सिद्धार्थ  शिरोळेंना सलग दुस-यांदा संधी देण्यात आलीय पर्वतीतून माधुरी मिसाळांना तर सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय.शहरातील दोन विद्यमान आमदारांवर मात्र वेट अँड वॉचची वेळ आलीय.  खडकवासला मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भीमराव तापकिरांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. त्याचवेळी कॅन्टोन्मेंटचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना देखील पहिल्या यादीत संधी मिळालेली नाहीये. या दोन्ही जागांबाबत महायुतीतील जागावाटपात काही फेरबदल होणार आहेत का?, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत.