Drishyam 3 : दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांनी गुरुवारी 'दृश्यम 3' चित्रपटावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे की या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या पार्टवर काम सुरु आहे. त्यांनी सोशल मीडियावर दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि निर्माता एंटनी पेरुंबवूरसोबत फोटो शेअर केला आहे. या पोस्टला पाहून चाहत्यांचा आनंद हा गगणात मावेना असा झाला आहे.
मोहनलाल यांनी दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि निर्माता एंटनी पेरुंबवूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मोहनलाल यांनी लिहिलं की भूतकाळ कधीच शांत राहत नाही. 'दृश्यम 3' कन्फर्म. दृश्यम असा चित्रपट आहे. ज्यानं प्रत्येक भाषेत तयार असलेल्या रीमेकनं धमाल केली आहे. या फ्रेंचायझीच्या पहिल्या पार्टच्या काही रीमेक तयार झाले. 2013 मध्ये तमिळमध्ये Papanasam, तेलगूमध्ये Drushyam, कन्नडमध्ये Drishya, हिंदीत Drishyam आणि चायनीजमध्ये The Witness नावानं रीमेक तयार झाले आहेत.
याचा सीक्वल 'दृश्यम 2' च्या हिंदी तेलगू आणि कन्नडमध्ये रीमेक तयार झाला. यात अजय देवगण, व्यंकटेश आणि रविचंद्रननं काम केलं आहे. तर सगळ्यात पहिले जो चित्रपट आला त्यात मोहनलाल यांनी काम केलं होतं.
दरम्यान, आता सगळ्यांचं लक्ष असलेल्या या 'दृश्यम 3' मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याला घेऊन चर्चा सुरु आहे. नेमकं त्यात काय वेगळं असणार आहे आता गोष्ट कशी खुलणार हे पाहणं सगळ्यांसाठी प्रतीक्षेचं असणार आहे.
हिंदीमध्ये अजय देवगणनं दोन्ही 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' मध्ये काम केलं. त्याचा दमदार अभिनय आणि उत्तम पटकथेमुळे दोन्ही चित्रपट हिट झाले. त्याच्याजवळ 2025 मध्ये अनेक चित्रपट आहेत. तो लवकरच आजाद', 'रेड 2', 'दे दे प्यार दे 2' आणि 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याशिवाय त्यानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात नरेशन देखील केलं आहे.