कोल्हापूर : पंचगंगेच्या प्रदुषणाप्रकरणी आज महापालिकेच्या चांगलाचा फटका बसलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं आज पालिकेची वीज एक तासासाठी खंडीत करण्याचा निर्णय दिला. वीज मंडळाकडून काही वेळ या आदेशाचं पालन करण्यात टाळाटळ करण्यात आली. पण शिवसैनिकांनी आंदोलनचा पवित्रा घेतल्यावर एक तास म्हणजे साडे अकरा ते साडे बारा असा एक तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
पंचगंगा नदी प्रदुषणास कोल्हापूर महानगरपालिका कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पुन्हा एकदा प्रदूषण नियत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालीकेची विज तोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार वीज वितरण कंपनीनं नुतन महापौर यांचा पदभाराचा कार्यक्रम सुरु असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेची वीज एक तासभरासाठी वीज पुरवठा खंडीत केला.
सुरुवातीला महावितरण कंपनीचे अधिकारी कारवाई करायला टाळाटाळ करत होते. पण कोल्हापूरतील शिवसैनिकांनी अधिका-यांना दम भरल्यानंतर विज वितरण कंपनीला कारवाई करणं भाग पडलं. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदुषणामध्ये कोल्हापूर महानगरपालीकेचा मोठा वाटा आहे. त्यामुळं यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ वारंवार महानगरपालिकेला नोटीस पाठवून प्रदूषण थांबविण्याचे आदेश दिले होते.
या सगळ्याला केराची टोपली दाखवत महानगरपालिका पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरली आहे. त्यातच 14 सप्टेंबरला 2017 झालेल्या जोरदार पावसामुळं मुख्य ड्रेनेज लाईन फुटून त्यातील मैला मिश्रीत पाणी थेट नाल्यामार्गे पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळं 27 डिंसेबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूरच्या आयुक्तांना नोटीस पाठविली.
त्याचबरोबर वीज वितरण कंपनीला सकाळी साडे आकरा ते साडे बाराच्या दरम्यान वीज तोडण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे वीज वितरण कंपनी कारवाई करेल, असं वाटत होत. पण कंपनीच्या अधिका-यांना ही कारवाई करायला टाळाटाळ केल्यानं शिवसैनीका चांगलेच संतापले, त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना धारेवर धरले.