रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथील पटांगणात लावणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या दरम्यान अमाफ गर्दी जमलेल्या काही प्रेक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहताना शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. शाळेच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांतून उठत आहे. बेडग येथील एका मंडळाच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या व बेडग गावचे नाव देशात गाजविणार्या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Gautami patil lavani video : सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरू झाला. हे नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून व बाहेरून चाहते आले होती. कार्यक्रमा वेळी शाळेच्या पटांगणात अमाफ गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारू छतावर जाऊन नृत्याचा ताल धरू लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कंपाऊंड चेही नुकसान झाले त्याच बरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते तेही झाड मूळा सहित कोसळले. (Instastar Gautami Patil Lavani program the audience cheered young people came enthusiastically nz)
VIDEO | इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, शाळेच्या छताचा चुराडा तर झाडावर प्रेक्षक बसल्याने झाडे तुटली; सांगलीतील घटना #Sangli #GautamiPatil #Lavani #DanceVideo #Zee24Taas pic.twitter.com/oxtCnKcxx0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 31, 2022
सोशल मीडियावर अनेक लावणीचे व्हिडिओ व्हायरल असतात. सध्या प्रसिद्ध असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील ही अनेक मुद्दंयामुळे चर्चेत असते. तिच्या अश्लील लावणी प्रकार हा तरुणांमध्ये उत्साह आणतो. ती तिच्या लावणीच्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर आणि वैसक्तिक आयुष्यातही ट्रोल होत असते पण तरीही तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी असते.