शिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

जळगाव पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहायला मिळाला. 

Updated: Aug 1, 2018, 07:16 PM IST
शिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा  आरोप title=

जळगाव : पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहायला मिळाला. महापालिकेसाठी मतदान सुरु असताना भाजपनं पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. तसेच समता नगर भागात भाजप पदाधिकाऱ्यांचं वाहन पकडण्यात आलं. त्यात ४० लाख रुपये असल्याचा आरोप केला जातोय. हे वाहन भुसावळ नगरपरिषदेच्या बांधकाम सभापतींचं आहे. रामानंद नगर पोलिसांनी ही गाडी जप्त केली. या गाडीत भाजपचे प्रचार साहित्य तसंच एक पिशवी आढळून आलीय. या पिशवीत नेमकं काय आहे पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव महापालिका निवडणुकीत मतदार शिवसेनेचा भगवा फडकवतील, असा दावा शिवसेना नेते तसंच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. शिवसेनेच्या प्रचारात गेले काही दिवस गुलाबराव पाटील सक्रीय होते. दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजप धनशक्तीचा मोठा वापर करीत असल्याचा आरोपही गुलाबराव पाटलांनी केलाय.