Electricity just 2 Rupees: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास स्वस्तात वीज दिली जाणार आहे. तसेच वीज कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राज्य सरकारच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारला साडेसात रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची बचतही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना वीज देण्याची प्रक्रिया 11 महिन्यात काम पूर्ण करण्यात आली आहे. तरीही दीड वर्षात हे काम पूर्णत्वास येईल. एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होतील. 50% फीडर्सचे काम पूर्ण होताच, महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि खर्चाची बचत होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.
महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. 3 ते 4 वर्षांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. सध्या सबसिडीवर राज्य सरकारसला 13 हजार कोटी रुपये खर्च करावा लागतो. पण शेतकऱ्यांना सौर पंप दिल्यास सरकारचा हा खर्च वाचणार आहे.
या प्रकल्पासाठी राज्य सरकार 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 25000 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.