डोंबिवलीत जन्मली नागिणीची २५ पिल्लं

डोंबिवलीत नागिणीने घातलेल्या अंड्यातून २५ पिल्लं बाहेर आली आहेत. १५ एप्रिलला एका नागिणीला डोंबिवलीजवळ पकडण्यात आलं होतं...    

Updated: Jun 5, 2018, 01:45 PM IST

डोंबिवली :  डोंबिवलीत नागिणीने घातलेल्या अंड्यातून २५ पिल्लं बाहेर आली आहेत. १५ एप्रिलला एका नागिणीला डोंबिवलीजवळ पकडण्यात आलं होतं. डोंबिवलीच्या अग्निशमन दलाने अशा सापांसाठी खास जागा केली आहे.... तिथे या नागिणीला ठेवण्यात आलं होतं. त्याच जागी नागिणीने २५ अंडी घातली होती. त्यातून २५ पिल्लं बाहेर आली आहेत. अस्सल नागाची ही पिल्लं पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.