Maharashtra News : महाराष्ट्रातील बिबट्याची नसबंदी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे यांनी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची दखल घेत वनमंत्री मोठा निर्णय घेणार आहे.
मागील काही वर्षात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात अनके चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बिबट्यांची दहशत पहायला मिळते. यामुळे बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. याकरिता बिबट्यांची नसबंदी करावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. याबाबत सत्यजीत तांबे यांनी वनमंत्री गणेस नाईक यांना पत्राद्वारे या मागणीचे निवेदन दिले आहे.
धन्यवाद, वनमंत्री मा. गणेश नाईक साहेब ! आपण माझ्या मागणीची दखल घेतली. मात्र, आता वेळ आली आहे तातडीने कार्यवाही करण्याची. मानवी वस्तीवरील बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता आपण तातडीने केंद्रीय वनमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा व बिबट्यांच्या नसबंदीबाबत लवकरात लवकर धोरण राबवावे, ही नम्र विनंती..
यापूर्वी जून 2024 मध्ये देखील सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान तांबे यांनी केंद्र सरकारकडे बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मागितली. मात्र, राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार विचार करून त्याला मंजुरी देईल असे सांगितले होते.
हिवाळी अधिवेशनातही सत्यजीत तांबे हा मुद्द उपस्थित केला. बिबट्याचा प्रादुर्भाव असलेल्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आणि घरांना कुंपण बांधण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी तांबे यांनी केली होती.