मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Updated: Apr 11, 2022, 03:15 PM IST
मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर title=

मुंबई : Congress Minister Yashomati Thakur on  Chief Minister : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं दिसले असेत, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. ठाकूर यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमधून धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं मानले जाते आहे. शिवसेना नेत्या आणि विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलंय. पवारांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडा असा टोला त्यांनी मारला.

अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री सुनील केदार आणि इतरही मान्यवर देखील मंचावर उपस्थित होते. मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) मोठे विधान केल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे वक्तव्य त्यांनी केले.  शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे. ते आपल्या सोबत आहेत, म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.  

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन हा नवा वाद पुढे आला आहे. ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी टोला लगावला आहे. या वादाची ट्विटरवर चर्चा रंगली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी शरद पवार आहेत. काल शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते आणि त्यांच्या उपस्थित मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे विधान केले. 

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 'काल इतका मोठा भयाण हल्ला झाला, प्रत्येकजण मला विचारत होते की साहेब येणार आहेत का? पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. तुम्ही थकत कसे नाहीत.आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात आणि तुम्ही थांबत कसे नाहीत. म्हणजे कौतुकच वाटते. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे, असे गौरउद्गगार त्यांनी यावेळी काढलेत.