Eknath Shinde on Marathwada:आम्ही सत्तेत आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 29 मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 45 हजार कोटी रुपयांचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
35 सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, 21 दिवसांचा खंडबाबत आम्ही पीक विमा कंपन्यासोबत बोलतोय.. नियम बदलून मदत होईल. याची कमिटी सरकारने नेमलेली नव्हती. त्याचा रिपोर्ट तयार करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
विरोधकांनी बैठक होऊ नये असे प्रयत्न केलेते स्वतः काहीही करत नाहीत फक्त बोट दाखवताय, नाव ठेवतायत. आम्ही काय केलं विचारणार्यांनी अडीच वर्षात काय केलं सांगावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 4 ऑक्टोबर 2016 बैठकीत 31 निर्णय घेण्यात आले होते, 2017 ला आढावा घेतला.10 विषय पूर्ण झालेले, 15 टप्प्यात आणि 6 अपूर्ण होते, आज 31 पैकी 23 पूर्ण झाले आहेत, 7 प्रगतीपथावर आहे तर एक उद्धवजींच्या काळात कुठेतरी गेलाय, असा टोला फडणवीसांनी लगावला.
जालना सीड पार्क ला उद्धव सरकारने मान्यता दिली नव्हती , आम्ही देतोय. उद्धव साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीड योजनेचा खून केला,मुडदा पाडला आणि आताआम्हाला विचारताय, असो यात आता केंद्र मदत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.