राष्ट्रपतीपदाची निवडणूक: एका तासात मुख्यमंत्र्यांसह ७० आमदारांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक 62 मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Updated: Jul 17, 2017, 01:13 PM IST
राष्ट्रपतीपदाची निवडणूक: एका तासात मुख्यमंत्र्यांसह ७० आमदारांनी केलं मतदान title=

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक 62 मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

आज सकाळपासून महाराष्ट्र विधानसभेत मतदानाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहिल्या तासाभरात ७० आमदारांनी मतदान केलं. काही वेळापूर्वी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी मतदानासाठी विधानभवानत प्रवेश केला. पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणारे छगन भुजबळ हे सुद्धा मतदानाला येणार आहेत.