मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार केला जात आहे. यासाठी एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चाही सुरू आहे. खासगी टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यांना हा मोठा दिलासा असेल.
मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाडय़ा सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे.बोरीवलीतून एकूण शिवनेरीच्या १२ फेऱ्या पुण्याकडे होतात. यापैकी काही फेऱ्या या मुंबई विमानतळाच्या मार्गे जोडल्या जावू शकतात.
पुण्याशिवाय अजून इतर कोणत्या शहरात प्रवाशी जातात त्या दिशेने देखील सेवा देण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एसटी महामंडळाकडून मोठा दिलासा प्रवाशांना मिळू शकतो.