नागपुरात भाजपला दे धक्का, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. भाजपचे पदाधिकारी आपल्या गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलेय. 

Updated: Sep 5, 2018, 07:13 PM IST
नागपुरात भाजपला दे धक्का, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत title=

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. भाजपचे पदाधिकारी आपल्या गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलेय. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश  केलाय.

सेना-भाजपवर निशाणा

यावेळी राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. राम कदम सारखे आमदार भाजपकडे असल्याने भाजपची संस्कृती कुठली आहे, ते समजून येते. तर शिवसेनेवर आता विश्वास राहिला नाही, भाजपच्या सावली खाली ते टिकून आहेत, असे जयंत पाटील म्हणालेत.

आघाडीबाबत स्पष्टीकरण

आगामी निवडणुकीसाठी आघाडीबाबत जयंत पाटील यांनी यावेळी विधान केले. काँग्रेससोबत आघाडीबाबत अजून निर्णय झालेला नाही. ५०-५० चा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही. आम्ही आघाडी करावी या विचाराचे आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

विक्रमवीर मोदी

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी फटका बसेल असा अंदाज आम्हाला आला होता. मात्र या यावेळी चित्र वेगळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विक्रम करण्याची सवय असल्याने पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार करण्याचा विक्रम त्यांच्याच कालावधीत होईल, अशी बोचरी टीका केली.