Beed Crime: बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी आणि सीआयडीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील राजकीय कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विरोधकांनी आता एसआयटीवरच गंभीर सवाल केलेत. एसआयटीमधील अधिकारी आणि आरोपींचे खास संबंध असल्याचा दावा विरोधकांनी केलाय. त्यामुळे एसआयटीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. याप्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. मात्र आता एसआयटीवरच विरोधकांनी गंभीर आरोप केल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत. एसआयटीच्या पथकातील IPS अधिका-यासोबतचे सर्व पोलीस वाल्मिक कराडचे खास माणसं असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. PSI महेश विघ्ने आणि मनोजकुमार वाघ ही वाल्मिकची माणसं असल्याचा दावाही आव्हाड यांनी केलाय.
खासदार संजय राऊतांनी बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी केलीय. एसआयटीमधील पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडचे सोबतचे फोटो समोर आल्यानंतर राऊतांनी प्रश्न उपस्थित केलेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतोष देशमुख प्रकरणात सातत्यानं आक्रमक भूमिका मांडताहेत. एसआयटी आणि सीआयडी तपासावर मात्र दमानियांनी नाराजी व्यक्त केलीय. तपासासाठी बाहेरून माणसं आणण्याची मागणीही त्यांनी केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. आरोपींच्या जवळच्या अधिका-यांना तत्काळ हटवलं पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी आणि सीआयडीचं गठन करण्यात आलंय. विरोधकांनी याप्रकरणातील राजकीय कनेक्शनवरूनही गंभीर आरोप केले आहेत. मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. मात्र आता थेट एसआयटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सरकार यावर काय स्पष्टीकरण देतं, हे पाहावं लागणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप करत पोलीस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती. त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली होती.नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारताच बीड पोलीस दलातील चार अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्यात.चार पोलीस अधिका-यांच्या केलेल्या बदल्यावरून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत बाबत हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पोलिसांवर होत असलेल्या आरोप आणि पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा.उंचवता यावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी कंबर कसल्याचं म्हटलं जातलंय.