Anand Mahindra Travel : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगसमुहाची (Mahindra and mahindra) धुरा सांभाळत असतानाच आनंद महिंद्रा इतरही अनेक मुद्द्यांवर लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावर त्यांच्या एकंदर पोस्ट आणि त्यांची मतं पाहता हे लक्षात येतं. 90 तास काम, रविवारची सुट्टी विसरून काम... इथपासून अगदी ऑटो, कृषी, उद्योग, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्रातील एखादी नवी अपडेट अनेक मुद्द्यांवर आनंद अंबानी त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. याच उद्योजकानं आता सोशल मीडियावर एका अशा जागेचा उल्लेख केला आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत.
मागील काही वर्षांमध्ये प्रवास आणि त्याभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना नावारुपास आल्या. त्यातच आता भर पडलीये ती म्हणजे एका अशा जागेची, जिनं आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडली आहे. हल्लीच Sam Dalrymple या लेखकानं भारतात भेट दिली. यावेळी तो रामपूर इथं गेला आणि तिथं त्यानं जे पाहिलं त्याविषयी सोशल मीडियावर सुरेख प्रतिक्रिया दिली.
'या शहरानं मला भारावून सोडलं' असं त्यानं म्हटलं. राजेशाही थाट असणाऱ्या या शहराविषयी लिहितानं त्यानं या शहरावर अफगाणी संस्कृतीचा असणारा प्रभावही अधोरेखित केला. इतक्यावरच न थांबता त्यानं X च्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या एका सुरेख आणि वास्तूचा फोटोही शेअर केला. त्याची हीच पोस्ट आनंद महिंद्रा यांनी पाहिली आणि मग काय? त्यांनीही या जागेचा शोध घेत माहिती मिळवली आणि याच शोधातून त्यांना एक भन्नाट ठिकाण सापडलं. एक असं ठिकाण ज्याची साऱ्या जगाला भुरळ पडेल.
परदेशी लेखक आणि आनंद महिंद्रा यांना भारावून सोडणारं, पहिल्या नजरेत थक्क करणारं हे ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील रामपूर शहर. Sam Dalrymple नं एक्स पोस्टमध्ये रामपूरमधील रझा ग्रंथालयाचा फोटो शेअर केला. 'भारतातील एक सुंदर ग्रंथालय. रामपूर ग्रंथालय हे बहुधा आजच्या आधुनिक भारतात जपूर ठेवलेल्या पुरातन वास्तूंपैकी एक आहे. इथं जवळपास 30000 हून अधिक दुर्मिळ अस पश्तो, संस्कृत, हिंदी आणि उर्दूसह तामिळ भाषेतील ताम्रपट आहेत', अशी माहितीसुद्धा त्यानं दिली.
ही पोस्ट व्हायरल झाली आणि हीच व्हायरल पोस्ट महिंद्रा यांच्यापर्यंतही पोहोचली. बस्स.... मग काय? त्यांनी त्यांच्या परिनं या जागेची माहिती मिळवली आणि हे किती कमाल आहे याविषयी आपलंही मत मांडलं. 'स्थापत्याचा उत्तम नमुना असणारी ही वास्तू. मुळात अशी वास्तू अस्तित्वात आहे याचीच मला कल्पना नव्हती', असं लिहित आपल्याला आतापर्यंत या जागेची माहिती नव्हती याविषयी त्यांनी काहीशी खंतही व्यक्त केली. इतकंच नव्हे, तर त्यांनी या ठिकाणाला 'भेट' दिलीच पाहिजे' असंही ठरवलं.
इथं महिंद्रा यांनी या ठिकाणाचं कौतुक केलं आणि तिथं गुगल सर्चवर प्रत्येकानंच जाऊन रझा ग्रंथालय, रामपूर ग्रंथालय, रामपूर लायब्ररी अशा एक ना अनेक गोष्टी सर्च केल्या. तिथं कसं पोहोचायचं, किती वेळात पोहोचायचं याविषयीची माहिती शोधली.
That is a magnificent structure.
I had absolutely no idea of its existence. I’m embarrassed.
By itself, it makes Rampur a must-see destination… https://t.co/5gnbeMHch5
— anand mahindra (@anandmahindra) February 4, 2025
रामपूर रझा लायब्ररी अर्थात (Rampur) रामपूर रझा ग्रंथालयाचा शोध 1774 मध्ये नवाब फैजुल्ला खान यांनी लावला होता. रामपूरचे नवाब हे कायमच तज्ज्ञ, कवी, चित्रकार, सुलेखनकार, संगीतकार अशा कलाकारांसह कलेला जपण्यासाठी ओळखले जातात. या ग्रंथालयामध्ये विविधभाषी ताम्रपट जतन करून ठेवण्यात आले आहेत. रामपूरचं पूर्वीचं नाव मुस्तफाबाद. हे (Uttar Pradesh) उत्तर प्रदेशातीलच एक ठिकाण, जे आता नव्यानं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होऊ पाहतंय.