Ajit Pawar : अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने "एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत" अशा आशयाचे बॅनर दाखवले. यावेळी अजितदादा यांनी तुझ्याशी बोलतो नंतर अस म्हणत भाषण पुन्हा सुरू केले. तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले.
नेमकं काय घडलं?
मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने बॅनर दाखवत अजितदादा यांना आपल्या राष्ट्रवादीत परत या अशी विनंती केली आहे. या कार्यकर्त्यांच्या हातामधील बॅनरवर 'आवाज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दादा या ना.. आपल्या राष्ट्रवादीत' असे लिहिले आहे. हा कार्यकर्ता अजित पवार यांच्या भाषणावेळी मोठ-मोठ्याने आवाज देत अजितदादा यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची विनंती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
मी पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता
मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्यांने 'अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत' असा मजकूर असणारा बॅनर दाखवला. त्यानंतर या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, अजितदादा यांनी पुन्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये यावे. पवार कुटुंब एक राहिले पाहिजे आणि विकास देखील असाच सुरु राहिला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी एक होणे खूप गरजेचे आहे.
ज्यावेळी मी अजितदादा यांना बॅनर दाखवला. त्यावेळी अजितदादा मला म्हणाले की, नंतर भेट मी तुझ्याशी बोलतो. मात्र, अजितदादा याचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते आता भेटले नाहीत. पण मी त्यांची पुन्हा भेट घेणार आहे. मी पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या फोनवर देखील साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो आहे.