Aurangabad Child Death: लहान मुलांकडे लक्ष देणे हे पालकांसाठी महत्त्वाचे झाले आहे कारण आजकाल लहान मुलांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. अंघोळीसाठी काढून ठेवलेल्या गरम पाण्यात पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंघोळीसाठी बकेटमध्ये हिटर लावले असताना गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुकली गंभीररीत्या भाजली होती. उपचारादरम्यान त्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून ही घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. श्रेया राजेश शिंदे (रा. साईनगर, कमळापूर) असे या मृत मुलीचं नाव आहे. (aurangabad news 4 year old child dies after falling into a tab of hot water)
हा हिटर घरातील जिन्याखाली असलेल्या नळाजवळ लावला होता. त्या नळापाशी ही चिमुरडी हात धुण्यासाठी गेली असताना क्षणातच होत्याच नव्हतं झालं. हात धुताना तिचा तोल गेला आणि ती त्या ठिकाणी हिटरखाली लावलेल्या गरम पाण्यात पडली. तिला तातडीनं उपचारांसाठी घाटी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच तिचा शुक्रवारी सातच्या सुमारास मृत्य झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेयाचे वडील राजेश शिंदे हे आपल्या बायको, दोन मुली व आई-वडिलांसह कमळापूर येथील साईनगर परिसरात राहत होते. मुलीची आई माहेरी गेली असल्यानं श्रेया आपल्या आजी-आजोबांसह आपल्या वडिलांसोबतच राहत होती. बुधवारी दुपारी दोन वाजता राजेश शिंदे हे कामावरून घरी परतले होते त्यांनी त्यानंतर कामावरून घरी आल्याने आंधोळीसाठी जिन्याखाली असलेल्या नळापाशी बादलीत पाणी गरम करण्यासाठी हीटर लावले होते. परंतु कशाच थांगपत्ता नसताना अचानकच ती मुलगी तिथं आली आणि या घटनेतून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
राजेश यांनी पाणी गरम होईस्तोवर श्रेयाला जेवायला घातले आणि तिच्यासोबत जेवणही केले. जेवण आटोपल्यानंतर श्रेया हात धुण्यासाठी जिन्याखाली असलेल्या नळापाशी गेली आणि त्याचवेळी पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती हीटर लावलेल्या बादलीत पडली. श्रेयाचा ओरडण्याचा आवाज ऐकून राजेश शिंदे पटकन घटनास्थळी पोहचले आणि त्याच क्षणी त्यांना श्रेया हीटर लावलेल्या बादलीत पडल्याचे दिसून आले. तिला त्यातून बाहेर काढून त्यांनी तिला विजेच्या शॉक लागल्याने दूर नेले. हीटरचे बटण बंद करून श्रेयाला बादलीतून बाहेर काढले.
गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत श्रेयाला रूग्णालयात नेले मात्र उपचारांचा काहीच उपयोग न झाल्यानं शुक्रवारी सकाळी सात वाजता तिची प्राणज्योत माळवली. या घटनेनं तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. तिचे प्राण वाचावेत म्हणून तिच्यासाठी सगळ्यांनीच प्रार्थना केली होती परंतु या बातमीनं परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.