Ajit Pawar on Shinde - Fadnavis government serious allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात रान उठवले आहे. दरम्यान, 2 ते 3 मंत्र्यांची माहिती आपल्या हाती आहे. पण पुरावे हाती आल्याशिवाय सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. कागदपत्रं, पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. बॉम्बस्फोट होतील असं आपण कधीच म्हणालो नाही, असा टोला अजित पवार यांनी मारला.
सीमाभाग केंद्रशासित केल्यास नवे प्रश्न निर्माण होतील, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातल्या काही गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचाही केंद्रशासित प्रदेशात समावेश करणार का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. तसेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्र सरकार या भागाला केंद्रशासित करुन घेईल का हाही मोठा प्रश्न आहे, असं पवार म्हणाले. तर समस्यांचंनंतर पाहून घेऊ असं राऊत म्हणाले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आज विधानसभेत काय उत्तर मिळणार याचीही उत्सुकता आहे. अब्दुल सत्तार आज विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. अजित पवारांसह विरोधकांनी काल अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरुन आरोप केले होते. त्याला आता सत्तार नेमकं काय उत्तर देणार याकडं सर्वाचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठराखण केलीय. नको ते आरोप करून विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडेत. जमीन घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
दरम्यान, दुसरीकडे आज महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे. सीमावादाबाबत काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारची कोंडी झाली. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाह, असा ठराव कर्नाटक विधानसभेने गेल्या आठवड्यात एकमताने मंजूर केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. कर्नाटकच्या आक्रमकतेला आज ठरावाद्वारे राज्य सरकार प्रत्युत्तर देणार आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला जाईल. तसंच गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीबाबत कर्नाटकला समज द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली जाणार आहे. मात्र सीमाभाग केंद्रशासित करावा या उद्धव ठाकरेंच्या मागणीचा मात्र ठरावात तूर्त उल्लेख नाही.