Girl Attack in Pune: पुण्यात (Pune) दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येमुळे खळबळ माजलेली असतानाच आणखी एका तरुणीवर हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर हल्ल्ला केला आहे. या हल्ल्याचं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं असून एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे तरुण हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
मानलं तुम्हाला! कोयत्याने वार करणाऱ्याला पकडलं, तरुणीलाही वाचवलं... पाहा कोण आहेत ते दोघं?
पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, आज दहाच्या सुमारास, एसपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुण आणि तरुणी आमने-सामने आले होते. दोघांची आधीपासून ओळख होती. दोघेही शिक्षणासाठी एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. नंतर दोघांचे बोलणे बंद झाले होते. तो मुलगा तिला सतत बोलण्यासाठी भाग पाडत होता. तिला फोन करत होता. तो इथे आला तेव्हा तिच्याबरोबर बोलण्याचा प्रय़त्न केला. तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. तिच्या हातावर व डोक्यावर जखम झाली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे..
मंगळवारी सकाळच्या सुमारास टिळक रोड येथे तरुण आणि तरुणी स्कुटीवरुन जात होते. एमपीएससीची तयारी करत असल्याने दोघेही अभ्यासिकेत निघाले होते. त्याचवेळी आरोपी तरुणाने त्यांना थांबवलं. तरुणीचा मित्र त्याला जाब विचारताना व्हिडीओत दिसत आहे. याचवेळी आरोपी बॅगेतून कोयता काढतो. तरुणीचा मित्र त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याच्यावर वार करत सुटतो.
Pune Girl Attacked | सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्यानं हल्ला; पाहा थरारक व्हिडिओ #pune #girlattacked #marathinews #zee24taas pic.twitter.com/XcGAcSruBv
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 27, 2023
दरम्यान यावेळी घाबरलेली तरुणी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबते. नंतर आरोपी तरुण आपल्या दिशेने येत असल्याचं दिसताच ती पळ काढते. यावेळी आरोपी तरुण कोयता घेऊन तिच्या मागे पळत सुटतो.
VIDEO: पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण
जखमी अवस्थेत तरुणी धावत होती. यादरम्यान कोणीही मदतीला पुढे येत नव्हतं. पण नंतर लेशपाल जवळगे नावाचा तरुण मदतीला पुढे धावला. कोयता हातात असलेला तरुण डोक्यात वार करणार इतक्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि त्याला रोखलं. त्यानंतर इतर लोकही पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. शंतनू जाधव (22) असं हल्लेखोर आरोपीचे नाव आहे. दरम्यान, तरुणी जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.