ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 28, 2018, 02:22 PM IST
ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू title=

बीड : ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

बीडच्या परळीमध्ये घडलीये धक्कादायक घटना

बीड जिल्ह्यातल्या परळी येथे ही दुर्देवी घटना घडलीये. आरती जाधव असे मृत पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे. 

बुस्टर डोस दिल्यानंतर चिमुकली दगावली

बुस्टर डोस दिल्यानंतर ही चिमुकली दगावली. डोस दिल्यानंतर साधारण तीन तासांमध्ये त्याची रिअॅक्शन दिसू लागते असे तज्ञांचे मत आहे. मात्र शनिवारी लस दिल्यानंतर दिवसभरात तिच्यावर कोणतीही रिअॅक्शन झाली नाही. 

तिला ज्या बॅचमधून हा डोस दिला त्यात काही त्रुटी होत्या का. तसेच तिचा मृत्यू झाल्यामागे काय कारण होते याचा तपास केला जात आहे. आंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजमध्ये तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.