Karnala Fort Panvel : पनवेल जवळील कर्नाला किल्ला हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ट्रेकिंग पाईंट आहे. ट्रेकर्स मोठ्या संख्येने येथे ट्रेकिंगसाठी येतात. मात्र, येथे ट्रेकिंग करणं पर्यटकाच्या जीवावर बेतले आहे. कर्नाळा किल्ल्यावर40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात एका पर्यटचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण गंभीर जखमी आहेत.
कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 9 जण जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. संदीप पुरोहित असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी आणि अन्य ठिकाणचे काही विद्यार्थी तसेच पर्यटक असे 40 ते 50 जण ट्रेकिंगसाठी पनवेलजवळील कर्नाळा किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावर झालेल्या गोंगाटामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मधमाशांच्या झुंडीने हल्ला केल्याने पर्यटक धावत सुटले. धावताना पडून नऊ जण जखमी झाले यात एका पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी मदत करून जखमी पर्यटकांना रेस्क्यू केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रेकिंगला जाताना काळी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ट्रेकिंगला जाताना फर्फ्युम, अत्तर किंवा डिओ लावून जाऊ नये. सुगंधामुळे माशा आक्रमक होतात. मधमाशांचा हल्ला झाल्यास धावाधाव न करता शांतपणे यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. तसेच जंगलातून ट्रेकिंग करताना प्राणी पक्षी तसेच इतर जीवांना त्रास होणाक नाही असे कृत्य करु नये असा सल्ला अनेक ट्रकिंग ग्रुप देतात.