गुप्तांगाला डंबेल्स बांधून लटकवले; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा अमानुष छळ, 'लोशन तोंडात भरुन...', पोलिसांच्याही अंगावर काटा

कोट्टयाम (Kottayam) येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्याने आपल्याला सामोरं जावं लागलेल्या हिंसक घटनांचा उल्लेख केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 01:50 PM IST
गुप्तांगाला डंबेल्स बांधून लटकवले; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा अमानुष छळ, 'लोशन तोंडात भरुन...', पोलिसांच्याही अंगावर काटा title=

केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा हिंसकपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याना नग्न करत, गुप्तांगाला डंबेल्स लटकवत, भूमिती बॉक्स कंपासने वार, तीन महिने मारहाण करण्यात आली. ही घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करत तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आपल्या ज्युनिअर्सवर अनेक महिने शारिरीक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 

ही घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली आहे, जिथे प्रथम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. हे सर्व विद्यार्थी तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. विद्यार्थ्यांनी तक्रारीमध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या आणि जवळजवळ तीन महिने सुरू असलेल्या हिंसक कृत्यांची सविस्तरपणे माहिती दिली आहे. 

'मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्...,' जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर

 

या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, निलंबित करण्यात आलं आहे. तसंच त्यांना रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडण्यात आलं तर त्यांच्या सीनिअर्सनी त्यांच्या गुप्तांगांवर डंबेल लटकवले. भूमिती बॉक्समधील कंपाससह धारदार वस्तूंनी त्यांना जखमीही करण्यात आलं.

हिंसाचार इतक्यावरच थांबला नाही. जखमांवर लोशन लावण्यात आलं, ज्यामुळे वेदना आणखी वाढल्या. वेदना असह्य झाल्याने विद्यार्थी ओरडू लागले असता लोशन जबरदस्ती त्यांच्या तोंडात भरण्यात आलं. सीनिअर्सनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्डही केला आणि ज्युनिअर्सला वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील असं धमकावलं. तुमचं शैक्षणिक करिअर बर्बाद करु अशी धमकी त्यांनी दिली होती. 

तक्रारीत असंही म्हटलं आहे की, रविवारी सीनिअर्स नियमितपणे ज्युनियर्सकडून दारू खरेदी करण्यासाठी पैसे उकळत असत. ज्यांनी नकार दिला त्यांना मारहाण करण्यात आली. छळ सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना माहिती दिली, ज्यांनी त्याला पोलिसांकडे जाण्यास प्रोत्साहित केलं. सध्या पाचही विद्यार्थी पोलिस कोठडीत आहेत आणि बुधवारी दुपारपर्यंत त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाण्याची अपेक्षा आहे.

कोची येथे एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याच्या आईने आरोप केला आहे की, तिच्या मुलाला विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती ज्यामुळे तो त्याच्या मृत्यूकडे ढकलला गेला.