आता गव्हापासून नव्हे तर बेसनापासून तयार करा ग्लूटेन फ्री चपात्या, मिळतील आरोग्यदायी फायदे

Besan Flour Chapati: बेसनचा वापर करून आपण रोजच्या स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. पण तुम्ही बेसनपासून तयार केलेल्या चपात्या कधी खाल्या आहेत का? रोज तुम्ही याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

Updated: Oct 13, 2024, 07:14 PM IST
आता गव्हापासून नव्हे तर बेसनापासून तयार करा ग्लूटेन फ्री चपात्या, मिळतील आरोग्यदायी फायदे title=

Benefits of Besan Flour Chapati: बेसनापासून तयार केलेल अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. बेसनाची भजी तर सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्ही कधी बेसनाच्या चपात्या खाल्या आहेत का? हरभऱ्यापासून बेसन तयार केले जाते जे प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे. यामुळे आपल्या शरीरातील अनेक फायदे होतात. बेसनामध्ये लिनोलिक ॲसिड (Linoleic Acid) आणि लिनलिक ॲसिड आणि ओलेइक ॲसिडही (Oleic Acid) चांगल्या प्रमाणात आढळते. जाणून घेऊया बेसनच्या चपात्या खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात?

बेसनाच्या चपात्या खाण्याचे फायदे

1. पिंपल आणि अ‍ॅक्ने
बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, विशेषत: पिंपल आणि अॅक्ने मुळापासून दूर करण्यासाठी बेसनचा चांगला फायदा होतो. कारण त्यात भरपूर प्रमाणात झिंक असते.

2. मधुमेहापासून आराम
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी बेसनाच्या चपात्या खाव्यात. कारण बेसनाच्या चपात्यांमध्ये ग्लुटेन नसते, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

3. हृदयाचे आरोग्य सुधारेल
बेसनामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. बेसनाच्या चपात्या खाल्ल्याने पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते. हे पोषक तत्व रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4. वजन कमी करण्यास मदत
तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि कमी होत नसेल तर गव्हाच्या चपात्यांऐवजी बेसनाच्या चपात्या खायला सुरुवात करा. यामुळे फायबर भरपूर प्रमाणात मिळते, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. भूक कमी झाल्यामुळे तुम्ही जास्त अन्न खात नाही आणि नंतर हळूहळू वजन कमी करण्यास मदत होते. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)