New Born Baby Helath Tips : नवजात बाळ दिसायला जेवढं गोंडस असतं तेवढं नाजूक देखील असतात. बाळाला पाहतात मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही तर बाळाला हातामध्ये घेऊन त्यांना घट्ट मिठ्ठी मारावी, त्यांच्या गालाचा पापा घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपलं हेच प्रेम लहान बाळचं आरोग्य धोक्यात आणू शकतं. कारण लहान बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशावेळी लहान बाळाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या लहान मुलांवर ही वेळ येऊ नये असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही किंवा इतर कोणालाही आपल्या मुलाचा पापा घेऊ देऊ नका, हेच बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
लहान बाळ खूप मोहक असतात. त्यांना पाहून सर्वजण आकर्षित होतात. त्यांचे इवले इवलेसे हात-पाय, गोंडस हास्य, गुबगुबीत गाल पाहून आपल्याला त्यांना जवळ घेऊन घट्ट मिठी किंवा पापा घ्यावासा वाटतो. आपण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बाळाचा पापा घेतो, पण जर तुम्ही नवजात बाळाचे पालक असाल तर तुम्हाला किंवा इतरांना तुमच्या बाळाला चुंबन न घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
नवजात बाळाची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी असते. म्हणूनच लहान बाळाला चुंबन घेणे योग्य नाही. असे केल्याने बाळाला संसर्ग आणि अनेक आजार होऊ शकतात. गंभीर आजारांपासून बाळाचे संरक्षण करायचे असेल तर कुटूंबानी किंवा इतर सर्वांनी लहान बाळाचे चुंबन घेणे टाळले पाहिजे. आरएसव्ही (रेस्पीरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) आणि इतर रोगांच्या वाढीसह, प्रत्येकासाठी लहान मुलांचे चुंबन घेण्याच्या धोक्यांबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे. बाळाला चुंबन घेतल्याने नेहमीच आरएसव्ही किंवा इतर संक्रमण होत नाही, तर ते विषाणूचा परिचय करून देऊ शकतात, ज्यामुळे बाळाची कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती लढू शकत नाही अशा आजारांना कारणीभूत ठरू शकते.
जंतूंचा प्रसार हा बाळाला आजारी पडण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. जो शारीरिक संपर्काद्वारे होतो आणि लहान मुले या जंतूंबद्दल संवेदनशील असतात, म्हणजेच जंतू त्यांना पटकन पकडतात. म्हणूनच लहान बाळाचे जंतूंपासून वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे चुंबन न घेणे आणि त्यांना अनावश्यकपणे स्पर्श न करणे.
लहान मुलांची श्वसनसंस्था खूपच लहान आणि अविकसित असते, त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांचा पूर्ण विकास होण्यासाठी सुमारे 8 वर्षे लागतात. एखाद्या मुलाचे ओठांवर चुंबन केल्याने फुफ्फुसात विषाणूचे संक्रमण होऊ शकते आणि श्वसनाच्या आजार पसरु शकतात.
लहान बाळाला चुंबन घेतले तर त्यांच्या त्वचेवर एलर्जी उठू शकते. परिणामी बाळाच्या त्वचेवर पुरठ उठणे, लालरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
एखाद्या लहान बाळाचे चुंबन घेणाऱ्या व्यक्तीने बाळाला ऍलर्जी असलेली काहीतरी खाल्ले असेल, जसे की सुका मेवा, सोया किंवा इतर काही, तर मुलाचे चुंबन घेतल्यास ऍलर्जी होऊ शकते. याशिवाय लहान मुलांचे चुंबन घेतल्याने त्यांच्या दातांमध्ये कॅवीटी निर्माण होऊ शकते. चुंबन घेताना लाळ मुलांच्या तोंडात जाऊ शकते आणि लाळेमध्ये असलेल्या स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे मुलांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते.
पालकांनी आपल्या बाळाची काळजी घेणे महत्वाचे असते. जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी बाळापासून दूर राहावे. जर कोणी बाळाला हात लावणार असेल किंवा हातात घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीने आपले हात चांगले धुवावेत. पहिले काही महिने बाळाला गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा आणि तुमच्या घरी जास्त पाहुण्यांना आमंत्रित करू नका. अशी काळजी घेतल्याने तुमचे मूल सुरक्षित राहतील आणि त्यांना कोणतीही हानी होणार नाही. एकदा का बाळ मोठं झालं की त्याची प्रतिकारशक्ती चांगली बळकट होते आणि मग ते प्रतिकार करु शकते. त्यानंतक त्याला आजार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तोपर्यंत बाळाची अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचे असते.