चेहरा अधीक सुंदर दिसावा यासाठी महिला आयब्रोला नीट आकार देतात. असे केल्याने डोळ्याजवळील भाग उजळ दिसू लागतो. थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंगच्या मदतीने आयब्रोला आकार दिला जातो. साधारतः दर 15 दिवसांनी आयब्रोला शेप देतात.
आयब्रो बनवल्यानंतर जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्यावर त्वचेत ताण येतो, ज्यामुळे काही जणांना जळजळ, खाज किंवा सूज जाणवते. हे सहसा संवेदनशील त्वचेच्या लोकांना जास्त होते. पण काळजी करू नका. काही घरगुती उपाय केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते.
आयब्रोला आकार दिल्यानंतर त्वचा गरम आणि लालसर होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा तापमान कमी होतो आणि जळजळ कमी होते. हा उपाय त्वरीत परिणाम करतो. विशेषतः ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते. त्यांनी इतर क्रिम वगैरे वापरण्यापेक्षा थंड पाण्यचा वापर केलेला बरा.
अॅलोवेरा जेलमध्ये गारवा निर्माण करण्याचे गुणधर्म असतात. हे त्वचेला गारवा देते आणि हायड्रेट करते. आयब्रोजवळील भागावर ताजे अॅलोवेरा जेल लावा आणि 15-20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर हलक्या कोमट पाण्याने धुवा.
अनेकांना टी ट्री ऑइल म्हणजे चहाच्या झाडाचे तेल वाटेल पण हे चाहाचे तेल नाही. ही एक मेललेका अल्टरिफोलिया वनस्पती आहे. ही ऑस्ट्रेलिअन वनस्पती असली तरी बाजारात सहज मिळू शकते. टी ट्री ऑइलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जळजळ आणि सूज दोन्ही कमी होऊ शकते. काही थेंब टी ट्री ऑइल कापसावर घ्या आणि आयब्रोजवळील भागावर हलक्या हाताने लावा. हे संसर्ग होण्यापासूनही बचाव करते.
नारळ तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे आणि त्यात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे ते त्वचेची जळजळ कमी करते. थोडेसे नारळ तेल घ्या आणि प्रभावित भागावर हळुवार मालिश करा. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि आराम मिळतो.
हे ही वाचा: आता नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढणे झाले सोपे
कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेच्या जळजळला शांत करते आणि त्वचेला गुळगुळीत बनवते. थोडेसे थंड दूध कापसात भिजवा आणि ते आयब्रोजवळील त्वचेवर ठेवा. काही वेळानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
वरील कोणत्याही वस्तू उपलब्ध नसतील तरी तुम्ही फक्त बर्फाच्या मदतीने या समस्येपासून सूटका मिळवू शकता. अगदी हलक्या हाताने बर्फाचा तुकडा (क्युब) आयब्रो केलेल्या भागावर लावा. असे केल्याने त्वरीत आराम मिळेल.