नवी जीन्स जुनी दिसू लागली आहे का? 'हे' छोटेसे बदल करून आवडत्या जीन्सचा रंग टिकवा

आपल्या काही सवयींमुळे डेनीम जीन्सचा नवेपणा टिकून राहत नाही किंवा रंग निघून जातो. अशा वेळी दैनंदिन जीवनात केल्या जाणाऱ्या काही चुका टाळा. असे केल्याने जीन्स दीर्घकाळ वापरता येईल.   

Updated: Feb 9, 2025, 03:49 PM IST
नवी जीन्स जुनी दिसू लागली आहे का? 'हे' छोटेसे बदल करून आवडत्या जीन्सचा रंग टिकवा title=

Denim jeans pants: कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमात जाण्यासाठी अनेक वेळा आपण जीन्स घालतो. स्त्रिया असो किंवा पुरुष, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच जीन्सचा वापर करतात. शर्ट, टी-शर्ट, कुर्ता अशा अनेक पोषाखांवर जीन्स घालणे साहजिक आहे. पण काही महिन्यांतच जीन्सचा रंग फिका पडायला लागतो. यामागे तुमच्या काही सवयी कारणीभूत असू शकतात. जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची जीन्स दीर्घकाळ नवीसारखी राहील. आत्ताच जाणून घ्या जीन्सचा रंग टिकवण्यासाठी कोणत्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

1. जीन्स वारंवार धुणे  

जर तुम्ही जीन्स रोज धुता, तर त्याचा रंग लवकर फिका पडतो. प्रत्येक वेळी वापरल्यानंतर धुण्याची गरज नसते. तज्ज्ञांच्या मते, जीन्स 4-5 वेळा घातल्यानंतरच धुणे योग्य असते. यामुळे त्याचा रंग आणि कापड अधिक काळ टिकेल.

2. गरम पाण्याचा वापर  

जीन्स गरम पाण्यात धुतल्यास त्याचा रंग लवकर उतरतो. गरम पाणी कपड्याच्या डाईला कमकुवत करते, त्यामुळे जीन्स फिकी दिसू लागते. म्हणूनच जीन्स नेहमी गार किंवा कोमट पाण्यात धुवावी.

3. हार्ड डिटर्जंट किंवा ब्लीच वापरणे  

तुम्ही जर खूप मजबूत डिटर्जंट किंवा ब्लीच वापरत असाल, तर जीन्सचा रंग सहजच फिका पडू शकतो. डिटर्जंटमधील केमिकल्स जीन्सच्या कापडाला क्षति पोहोचवू शकतात. यासाठी सौम्य डिटर्जंट किंवा जीन्ससाठी खास तयार केलेले लिक्विड डिटर्जंट वापरावे.

हे ही वाचा: आता नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढणे झाले सोपे

4. थेट उन्हात वाळवणे  

काही लोक जीन्स उन्हात वाळवतात, ज्यामुळे त्याचा रंग पटकन फिका पडतो. सूर्यप्रकाशातील तीव्र किरणे कपड्याचा रंग कमी करतात. त्यामुळे जीन्स नेहमी सावलीत आणि उलटी करून वाळवावी, जेणेकरून तिचा रंग जास्त काळ टिकेल. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, जीन्सचमधील घाण काढण्यासाठी सूर्यप्रकाश एक चांगला स्त्रोत आहे.

5. मशीन ड्रायरचा जास्त वापर  

वारंवार वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये जीन्स वाळवल्यास तिचे कापड लवकर कमकुवत होते आणि रंगही निघू शकतो. त्यामुळे शक्यतो नैसर्गिकरीत्या सुकवण्याचा प्रयत्न करा.