दिवाळीच्या अगोदरच घरी लावा हे झाड; लक्ष्मीचा राहील कायम वास

दिवाळी आधीच लावा घरी हे झाड, लक्ष्मीचा कृपाशिर्वाद कायम राहील 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 20, 2024, 02:45 PM IST
दिवाळीच्या अगोदरच घरी लावा हे झाड; लक्ष्मीचा राहील कायम वास  title=

घरामध्ये ऐश्वर्य आणि सुख समृद्धी राहावी म्हणून मनी प्लांट लावलं जातं हे लोकांना माहिती आहे, तर देवी लक्ष्मीचे आवडते झाड म्हणजे क्रॅसुला वनस्पती हे झाड देखील समृद्धीसाठी ओळखली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दिवाळीपूर्वी हे रोप तुमच्या घरात लावायचे असेल तर जाणून घ्या काही सोप्या टिप्स. हे रोप घरात आणले सुख, समृद्धी. 

घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी तसेच घर सजवण्यासाठी घरातील रोपे लावणे लोकांना आवडते. या झाडामुळे घरात फक्त शांतताच नांदते असं नाही तर घराचं सौंदर्यही वाढते. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये देखील भिन्न वैशिष्ट्ये आहेत. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी लोक मनी प्लांट लावतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की, मनी प्लांट व्यतिरिक्त आणखी एक वनस्पती आहे जी देवी लक्ष्मीची आवडती मानली जाते.

माती आणि कुंडी 

Crassula हे झाड घरी लावल्यामुळे घरात ऐश्वर्य नांदते. त्याच्या गुणधर्मांव्यतिरिक्त, ही वनस्पती घरी देखील चांगली दिसते, जी आपल्या घराचे सौंदर्य वाढवू शकते. या वनस्पतीची लागवड करणे कठीण काम नाही. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या घरात आशीर्वाद आणणारी वनस्पती वाढवू शकता. क्रॉसुला रोपांची काळजी घेण्याच्या टिप्स देत आहोत.

असं लावा रोपटं 

बियांच्या साहाय्याने रोप वाढवायचे असेल तर कुंडीत किमान एक इंच अंतरावर एक ते तीन बिया पेराव्यात. आता हलकी माती शिंपडून बिया झाकून ठेवा आणि माती ओलसर ठेवण्यासाठी पाणी घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नर्सरीतून एखादे रोप विकत घेऊन कुंडीतही लावू शकता. यानंतर रोपाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

पाणी आणि उन्ह 

क्रॉसुला एक इनडोअर प्लांट मानलं जात, जरी त्याला दिवसभरात काही तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सूर्यप्रकाशात राहिल्याने क्रॅसुला वनस्पतीच्या पानांचा रंग गडद राहतो. अशा परिस्थितीत ही वनस्पती घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसभर प्रकाश पडतो. क्रॅसुला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जेव्हा माती कोरडी दिसते तेव्हाच पाणी द्यावे, लक्षात ठेवा की त्याची मुळे ओली राहिली पाहिजेत.

किड्यांपासून करा बचाव 

क्रॅसुला वनस्पतीची योग्य काळजी घेण्यासाठी, तुम्हाला ते कीटकांपासून संरक्षित ठेवावे लागेल. अशा वेळी किडींपासून बचाव करण्यासाठी रसायनांची फवारणी करण्याची चूक करू नका, त्याऐवजी कडुलिंबाचे तेल वापरा. एका स्प्रे बाटलीत पाणी टाका आणि त्यात एक किंवा दोन चमचे कडुलिंबाचे तेल टाकून फवारणी करा. ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत मानली जाते.