Trending News In Marathi: पत्नीने पतीला नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले. इतकंच नव्हे तर पती शुद्धीवर येताच त्याला विजेचे झटके दिले. इतकंच नव्हे तर, पतीच्या डोक्यावर बॅटने वार करत तिला गंभीर जखमी केले. आरोपी पत्नीने केलेल्या या कृत्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीही घटना घडली आहे. पतीने महिलेचा फोन हिसकावून घेतल्यामुळं ती चिडली होती. त्याच रागात तिने पतीसोबत हे राक्षसी कृत्य केले आहे. इतंकच नव्हे तर, पतीला मारहाण करत असताना त्याला वाचवण्यासाठी आलेल्या 14 वर्षांच्या मुलालाही तिने मारहाण केली आहे. या हल्ल्यात मुलगादेखील गंभीर जखमी झाला आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रदीप सिंह असं पीडित पतीचे नाव आहे. तर, बेबी यादव पत्नीचे नाव आहे. दोघांचे लग्न 2007 साली झाले होते. पीडित पतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अलीकडेच बेबी सतत कोणाशीतरी फोनवर बोलत असायची. तिच्या या वागण्याला कंटाळून प्रदीपने तिच्या माहेरी तिची तक्रार केली. तेव्हा त्यांनी तिला फोन पासून दूर ठेव, असा सल्ला दिला. माहेरच्या लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याने तिचा फोन ताब्यात घेतला. त्यानंतर चिडलेल्या पत्नीने त्याचे हात पाय बेडला बांधून त्याला विजेचा शॉक दिला आहे.
माझी पत्नी सतत इतर कोणाशी फोनवर बोलायची. मला हे लक्षात आल्यानंतर मी तिच्या घरच्यांना सांगितले. त्यांनीच मला तिचा फोन ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार मी तिचा फोन घेतला. मात्र, त्यामुळं ती इतकी चिडली की तिने मला व माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. 18 मे रोजी तिने माझ्यासोबत अमानुष व्यवहार केला. ती सतत मला क्रिकेट बॅटने मारत होती. त्यामुळं माझ्या शरीरावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जेव्हा माझ्या मुलाने मला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याच्यावरदेखील हल्ला केला, असं पीडित पतीने म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फरार आहे. तिच्यावर आयपीसी 307,328,506 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेचा शोध सध्या सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी अनिल कुमार यांनी म्हटलं आहे.