PM Awas Yojana: योजनेचे 50 हजार मिळाल्यानंतर त्या चौघी नवऱ्यांना सोडून प्रियकरांबरोबर पळून गेल्या

Wives Absconded With Lovers After Getting First Instalment Of PM Awas Yojana: या महिलांच्या पतींनी अधिकाऱ्यांना त्या प्रियकरांबरोबर पळून गेल्याचं सांगितलं आहे.

Updated: Feb 8, 2023, 09:59 AM IST
PM Awas Yojana: योजनेचे 50 हजार मिळाल्यानंतर त्या चौघी नवऱ्यांना सोडून प्रियकरांबरोबर पळून गेल्या title=
Wives Absconded With Lovers After Getting First Instalment Of PM Awas Yojana

Wives Absconded With Lovers After Getting First Instalment Of PM Awas Yojana: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे पीएम आवास योजनेअंतर्गत (first instalment of pm awas yojana) सरकारकडून देण्यात येणाऱ्या पैशांचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर काही विवाहित महिलांनी आपल्या जोडीदाराला धोका दिला (wives absconded with lovers) आहे. या चारही महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरांबरोबर पळून गेल्या आहेत. या चारही महिला पळून गेल्याने त्यांच्या नवऱ्यांसमोर आता दोन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

नवऱ्यांना रिकव्हरीचं टेन्शन

पहिली समस्या म्हणजे या घरांचं बांधकाम अद्याप सुरु झालेलं नसल्याने जिल्हा नगर विकास प्राधिकरणाने या अर्जदार महिलांच्या पतींना पैशांच्या रिकव्हरीसाठी नोटीसा (recovery notices) पाठवल्या आहेत. दुसरी समस्या म्हणजे आता पत्नी पळून गेल्याने हे पैसे पतींकडून वसूल केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या दुहेरी संकटाला नेमकं कसं तोंड द्यावं असा प्रश्न या चारही व्यक्तींना पडला आहे. सध्या तरी या चौघांनी या योजनेअंतर्ग दिला दुसरा हफ्ता पत्नींच्या खात्यावर पाठवू नये म्हणून संबंधिक विभागांकडे अर्ज केला आहे.

तिच्या खात्यावर पैसे पाठवू नका

शहरी भागांमध्ये स्वत:चं घर नसलेल्यांना पक्की घरं देण्यासाठी प्रधानमंत्री शहरी आवास योजना राबवली जाते. या योजनेचा महिला ही लाभ घेऊ शकतात. याच योजनेअंतर्गत बाराबंकीमधील बेलहरा, बंकी, जैदपूर आणि सिद्धौरमधील 4 महिलांच्या खात्यावर पहिला हफ्ता जमा करण्यात आला. मात्र बँक खात्यामध्ये पहिल्या हफ्त्याचे 50 हजार रुपये जमा झाल्यानंतर या चौघीही आपआपल्या प्रियकरांबरोबर पळून गेल्या. त्यामुळेच आता पुढले 50 हजार आपल्या पत्नींच्या खात्यावर पाठवू नये असा अर्जच या चौघांनी अधिकाऱ्यांकडे केला आहे. माझ्या पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवू नये ती प्रियकराबरोबर पळून गेली आहे, असं या चौघांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

जिल्हाधिकारीही गोंधळले

या लाभार्थ्यांच्या घरांचं बांधकाम करण्यासाठी स्थानिक अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी नोटीस पाठवून लवकरात लवकर घराचं बांधकाम सुरु करा असं सांगितलं. मात्र नोटीस पाठवल्यानंतरही बांधकाम सुरु झालं नाही. त्यामुळे पैशांच्या रिकव्हरीसाठी नोटीस पाठवण्यात आली असता पैसे मिळाल्यानंतर पत्नी प्रियकराबरोबर पळून गेल्याची चार प्रकरणं समोर आली. चारही व्यक्तींनी या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्नी प्रियकराबरोबर पहिल्या हफ्त्याचे 50 हजार रुपये घेऊन पळून गेल्याचं सांगितलं. त्यामुळे आता हे पैसे कसे मिळवायचे याबद्दल जिल्हाधिकारीही संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे.

दोघींना पैसे पाठवले नाही

या शिवाय फतेहपूर अलावा नगर पंचायतमधील दोन महिलांना पीएम आवास योजनेच्या लाभार्थी म्हणून 50 हजार रुपये पाठवले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच या दोघी प्रियकरांबरोबर पळून गेल्या. या दोघांनी अधिकाऱ्यांना पैसे पत्नीच्या खात्यावर पाठवू नये ती पळून गेली आहे असं सांगितलं. अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर ही तक्रार खरी ठरली आणि सरकारने या दोघींच्या नावावर 50 हजार पाठवले नाही.