Republic Day 2025 Live Streaming : घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कशी आणि कुठे? जाणून घ्या

Republic Day 2025: 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.या दिवशी नवी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन केले जाते. ही परेड घरबसल्या कशी आणि कुठे पाहता येईल? सविस्तर जाणून घ्या 

Updated: Jan 22, 2025, 05:13 PM IST
Republic Day 2025 Live Streaming : घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कशी आणि कुठे? जाणून घ्या title=

Republic Day 2025 Live Streaming : 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. संपूर्ण भारतात हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन केले जाते. राष्ट्रपती भवनापासून कर्तव्य पथावरून ही परेड इंडिया गेटच्या मार्गाने जाते. ही परेड पाहण्यासाठी फक्त भारत नाही तर जगभरातून लोक येतात. या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो. या परेडमध्ये लष्कर, नौदल आणि वायुसेना शक्ती प्रदर्शन करतात. तसेच अनेक आकर्षक कवायती आणि मोहक चित्ररथांचे सादरीकरण केले जाते. ही परेड पाहावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मग तुम्ही ही परेड घरबसल्या कशी आणि कुठे पाहू शकता? या विषयी सविस्तर जाणून घ्या.

यावर्षी परेडमध्ये विशेष काय?

या परेडमध्ये लष्करी सामर्थ्य, वाद्य पथकांचे सादरीकरण अशी भव्य प्रदर्शने सादर केली जातात. या वर्षी भारतीय संस्कृतीची विविधता दर्शवणाऱ्या एकूण 31 चित्ररथाच्या झलक दाखवण्यात येणार आहेत. क्षेपणास्त्र, अत्याधुनिक विमाने, शस्त्रास्त्रांचे आकर्षक प्रदर्शन आणि अनेक कलाकुसरी या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. त्याशिवाय या कार्यक्रमात चित्तथरारक कवायती आणि मोठमोठ्या कलाकरांचे सादरीकरण पाहण्यासारखे असणार. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावर्षी प्रलय क्षेपणास्त्र पहिल्यांदाच दिसेल. एवढेच नाही तर या परेडमध्ये पहिल्यांदाच तोफखाना रेजिमेंटच्या महिला अधिकारी सहभागी झाल्या आहेत.  कर्तव्यापथावरील संचलानाची सुरूवात 10 वाजल्यापसून होणार आहे. प्रजासत्ताक दिनी आयोजित परेड परिसराच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिट्रीचे सशस्त्र जवान तैनात आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण कुठे पाहणार?

प्रजासत्ताक दिनाची परेड आणि चित्ररथ सादरीकरण पाहण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी तिकीट विक्री खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण तुम्ही ही परेड घरबसल्या पाहू शकता. जगभरातील भारतीयांना ही परेड पाहता यावी यासाठी प्रसारमाध्यमांवरून यांचे थेट प्रक्षेपण केले जाते. भारताचे राष्ट्रीय प्रसारणकर्ता असलेल्या दूरदर्शन (Doordarshan) वाहिनीवर या संपूर्ण परेडचे थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येईल. दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरूनही आपण परेडचे थेट प्रक्षेपण पाहू शकतो. दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवरूनदेखील परेडचे थेट प्रसारण केले जाते. दूरदर्शनसोबत आकाशवाणीच्या अधिकृत रेडिओ वाहिनींवर याचे थेट प्रसारण ऐकता येणार आहे.

हे ही वाचा: तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाची सजावट कशी करावी? असा प्रश्न पडला असेल, तर जाणून घ्या 'या' 5 खास टिप्स

प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण कसे पाहावे?

प्रजासत्ताक दिनाची परेड घरबसल्या पाहण्यासाठी दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील लाईव्ह स्ट्रिमिंग व्हिडिओवर क्लिक करा आणि या परेडचे साक्षीदार व्हा.