VIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Updated: Jan 21, 2023, 09:14 AM IST
VIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का title=
Trending Video Shocking woman drags man on car bonnet for 3 to 4 km Bengaluru Viral on Social media

Trending Video : रस्ते अपघातासंदर्भात अनेक बातम्या, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. काही अपघात इतके भयानक असतात की, आपल्या अंगावर काटा येतो. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) एका खासगी बसला अपघात झाला. हा अपघात इतका विचित्र होता की अनेकांना यावर विश्वासच बसतं नाही. बसला अपघात झाल्यामुळे ती पटली झाली. त्यानंतर प्रवासी बसमधून बाहेर पडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने प्रवाशांना चिरडलं. या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. दुसरीकडे रस्त्यावरील अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ज्यात एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत नेताना दिसत आहे. 

काय आहे नेमकी घटना?

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला कारचालक एका व्यक्तीला तिच्या कारच्या बोनेटवर भरदिवसा रस्त्यावरुन जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत फरफटतं घेऊन जाताना दिसतं आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी बंगळुरुमध्ये घडला. ज्ञानभारती मेन रोडवरुन जात असताना या दोघांच्या गाडीची धडक झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने महिला कारचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला पण ती तिथे पळ काढण्याचा तयारी होती. ही बाब लक्षात आल्यानंतर तो व्यक्ती त्या महिलेच्या कारच्या बोनेटवर चढला. त्याला वाटलं त्यामुळे तिला पळता येणार नाही. पण महिलेने कसलीही परवा न करता बोनेटवर असलेल्या व्यक्तीसोबतच कार घटनास्थळावरुन पळविण्यास सुरुवात केली. ही सगळी घटना आजूबाजूला असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. (Trending Video Shocking woman drags man on car bonnet for 3 to 4 km Bengaluru Viral on Social media)

कुठे घडली ही घटना?

ही घटना शुक्रवारी बंगळुरुच्या ज्ञानभारती मेन रोडवर घडली. बोनेटवरील व्यक्तीचं नाव दर्शन असून महिला कारचालका प्रियंकाविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. महिला कारचालकासोबत तिचा पती आणि कारमधील अजून एका व्यक्तीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

विनयभंग केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाचे पती प्रमोद यांनी दर्शन आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात मारहाण आणि पत्नीच्या विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात एका वृद्धाला दुचाकीस्वार काही किलोमीटर रस्त्यावर फरफटत घेऊन जाताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.