वाघाने जबड्यात शर्ट पकडताच मुलगा म्हणाला, 'सोड मला, आई....' Watch Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये वाघाने एका मुलाचा शर्ट अक्षरशः जबड्यात पकडला आहे. पुढे जे घडलं ते नक्कीच भयावह आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 11, 2025, 11:13 AM IST
वाघाने जबड्यात शर्ट पकडताच मुलगा म्हणाला, 'सोड मला, आई....' Watch Video  title=

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये एका वाघाच्या तावडीत एक लहान मुलगा अडकला आहे. त्यानंतर त्या मुलाची जी अवस्था झाली आहे ती अक्षरशः पाहण्यासारखी आहे. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे. जेथे मुलाचं टीशर्ट पिंजऱ्यातील वाघाने आपल्या जबड्यात ओढून धरला आणि तो जोर जोरात खेचू लागला.

जेव्हा मुलगा मदतीसाठी आरडा ओरडा करु लागला. मदत मागू लागला. तेव्हा तो जे काही बोलत होता ते सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. तो चक्क वाघाला सांगत होता. मला सोडून दे, नाहीतर माझी आई ओरडेल. म्हणजे या मुलाला वाघापेक्षा आईची दहशत जास्त वाटत आहे. 

लोकांनी X वर व्हायरल व्हिडिओ पाहिला आणि त्यांना धक्का बसला. मुलगा ओरडला, 'कृपया माझा शर्ट सोडून द्या, नाहीतर माझी आई मला मारेल.' मला सोडून द्या, प्लीज. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे पण तो नेमका कुठचा आहे याबाबत अद्याप माहिती नाही. मुलाची ओळख आणि घटना कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हणून झी 24 तास हा व्हिडिओ किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही. या व्हिडिओबद्दल ऑनलाइन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकताना एका x युझरने लिहिले, 'या मुलाची प्रतिक्रिया अतिशय साधी आहे!' वाघ जेव्हा त्याचा टी-शर्ट धरतो तेव्हाही त्याचा पहिला विचार येतो, माझा शर्ट सोड, आई तुला मारेल. मुले त्यांच्या स्वतःच्या मजेदार पद्धतीने कशा प्रकारे व्यक्त होतात. याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्याने म्हटले, 'वाघाच्या हल्ल्याच्या आणि मृत्यूच्या भीतीपेक्षा आईच्या फटक्यांची भीती जास्त आहे. जगात असा कुणीच नाही जो आई आणि तिच्या माराला घाबरत नाही.' त्याच वेळी, अनेक युझर्नी मदत करण्याऐवजी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर राग व्यक्त केला.