RBI Gold Reserves : अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सगळ्याच देशांमध्ये सोनं खरेदीची स्पर्धा! भारताने किती विकत घेतलं?

Gold : सोनं खरेदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक... 500 वर्षांपूर्वी कोलंबस जे म्हणाला ते आजही खरं ठरतयं. यामुळेच सोनं खरेदी करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे पहायला मिळाले आहे. अनेक देशांनी विक्रमी सोनं खरेदी केली आहे. या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.  

वनिता कांबळे | Updated: Feb 11, 2025, 08:04 PM IST
RBI Gold Reserves : अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सगळ्याच देशांमध्ये सोनं खरेदीची स्पर्धा! भारताने किती विकत घेतलं? title=

World Gold Council : सोनं हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळेच अनेक देश मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. यासाठी विविध आपल्या सरकारी बँकाच्या माध्यमातून सोनं खरेदी करतात.  जगातील बड्या देशांच्या बँकां सोनं खरेदीसाठी चढाओढ पहायला मिळत आहे. भारताची रिझर्व्ह बँक  सर्वात जास्त  सोनं खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जाणून घेऊया भारताच्या रिझर्व्ह बँकेने किती टन सोनं खरेदी केलं आहे? या यादीत पहिल्यावर स्थानावर कोणता देश आहे. 

सोनं हे गुंतवणुकीचा सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित पर्याय आहे. सोन्याच्या गुंतवणुकीत कधीच तोटा होत नाही असा आजपर्यंत इतिहास आहे. सोन्यातील गुंकवणुक ही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या बळकटी देत असते. यामुळेच अनेक देश मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यावर भर देत आहेत. सोनं खरेदीत भारत देखील आघाडीवर आहे.

हे देखील वाचा... खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण 

गेल्या वर्षी विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक सोने खरेदी केले. आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून, जगातील मध्यवर्ती बँका दरवर्षी सरासरी 1000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करत आहेत. 2024 या वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली असता जगातील बँकांनी 1045 टन सोने खरेदी केले.

2024 या वर्षात सोने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये पोलंडची नॅशनल बँक पहिल्या स्थानावर राहिली. तर, भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दुसऱ्या स्थानावर  2023 मध्ये जगातील मध्यवर्ती बँकांनी 1037 टन सोने खरेदी केले. 1950 नंतरची ही सर्वाधिक विक्रमी सोनं खरेदी होती.  2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा  सोन्याचा साठा 72.6 टनांनी वाढवला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पोलंडच्या नॅशनल बँकेने 2024 मध्ये 90 टन सोने खरेदी केले आहे. 

आरबीआयकडे आता किती टन सोनं आहे?

डिसेंबर 2024 च्या अखेरीस आरबीआयकडे असलेल्या सोन्याचा नवीनतम साठा 876.18 टन होता. याची किंमत 66.2 अब्ज डॉलर इतकी होती. गेल्या वर्षी याच कालावधीत 48.3  अब्ज डॉलर किमतीचा 803.58 टनांपेक्षा जास्त सोनं खरेदी झाली. एका वर्षात 72.6  टन खरेदी करण्यात आली.

2024 मध्ये पोलंडची नॅशनल बँकने सर्वाधिक सोनं खरेदी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, पोलंडच्या सेंट्रल बँकेने 2024 मध्ये 90 टन सोने खरेदी केले. 2024 मध्ये चीनने 34 टन सोने खरेदी केले आहे. पण चीनकडे असलेला सोन्याचा साठा भारतापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. गोल्ड कौन्सिलच्या मते, चीनकडे 2264 टन सोन्याचा साठा आहे.