4000 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाला ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण...

ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अभिनयाच्या जगात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 11, 2025, 05:06 PM IST
4000  कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाला ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण... title=

Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट नाकारले देखील आहेत. अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटाला नकार दिला होता. ज्याने मोठ्या प्रमाणात कमाई केली होती.  

ऐश्वर्या रायच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने तिच्या अभिनयातून एक खास ओळख देखील निर्माण केली आहे. हॉलिवूडमध्येही तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. पण तिने एका मोठ्या हॉलिवूड चित्रपटाला नकार दिला होता. 

एका सीनमुळे दिला होता चित्रपटाला नकार 

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अशा काही कलाकारांपैकी एक आहे, जिने बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीमध्ये काम केलं आहे. आतापर्यंत तिने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, अभिनेत्रीने फक्त  एका सीनमुळे रेकॉर्डब्रेक चित्रपटाची ऑफर नाकारली होती. तथापि, आज अभिनेत्रीला हा चित्रपट नाकारल्याबद्दल पश्चात्ताप होत असेल. 

अभिनयाच्या जगात ऐश्वर्या राय तिच्या कामासाठी तसेच तिच्या अनोख्या शैलीसाठी देखील ओळखली जाते. ती अनेकदा चांगल्या कथा असलेल्या चित्रपटांमध्ये काम करते. मात्र, तिने 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' या चित्रपटाला का नकार दिला. दिग्दर्शक डग लिमन यांच्या या चित्रपटात ब्रॅड पिट आणि जॉन स्मिथ मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. या चित्रपटात ऐश्वर्या रायला त्याच्या पत्नीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातील काही सीनमुळे ऐश्वर्या रायने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. 

चित्रपटाने 4 हजार कोटींपेक्षा जास्त केली होती कमाई 

ऐश्वर्या रायबद्दल बोलायचं म्हटलं तर ती असा कोणताही चित्रपट करत नाही ज्यामध्ये ती कम्फर्टेबल नाही. या चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले असे म्हटले जाते. ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारल्यानंतर एंजेलिना जोलीने हा चित्रपट केला. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 4112 कोटी रुपयांची कमाई केली होती.