मुंबई : सेक्युरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर 'बुल रन' चालवणाऱ्या चॅनेलवर कारवाई केली आहे. सेबीने हे चॅनल चालवणाऱ्या 6 जणांवर कारवाईचे आदेश दिलेआहे. सेबीच्या तपासानुसार, जे लोक टेलिग्रामवर 'बुल रन' चॅनेल चालवत असत ते आधी स्वत: शेअर्स खरेदी करायचे. नंतर त्यांना ग्रुपमध्ये टाकायचे आणि किंमत वाढण्याची वाट पाहायचे आणि किंमत वाढताच हे शेअर्स विकायचे. असे करून या 6 जणांनी 2.84 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला आहे.
सेबीकडे नोंदणी नाही
नुकतेच सेबीने या लोकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुजरातमधील मेहसाणा आणि अहमदाबादमध्ये शोध मोहीम राबवली. सेबीला तपासणीत आढळून आले की, या सेबीची नोंदणी नाही. सेबीच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी 10 महिन्यांत 2.84 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला आहे.
सेबीची कारवाई
SEBI ने बुल रन नावाचे टेलीग्राम चॅनल चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांना शेअर बाजारात बॅन केले आहे. तसेच अवैध नफ्याची संपूर्ण रक्कम या लोकांकडून वसूल केली जाईल, असेही सेबीने म्हटले आहे.
आता हे 6 लोक पुढील आदेशापर्यंत बाजारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खरेदी किंवा विक्री करू शकणार नाहीत. सेबीच्या म्हणण्यानुसार या लोकांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
चॅनेलने काय केले?
सेबीने या चॅनलविरोधात 37 पानांचा आदेश जारी केला आहे. याआधी या कंपन्या स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत असत आणि त्यात पैसे गुंतवण्यासाठी लोकांना चुकीची माहिती देत असत. त्यानंतर या शेअर्सची किंमत वाढवून ते विकायचे.