Salary Hike 2025: यंदाच्या वर्षी तुमचा पगार किती टक्क्यांनी वाढणार? सर्वाधिक नफा कोणाचा?

Salary Hike 2025: अर्थसंकल्प, प्रस्ताव, आयकर आणि आता यामोगामाच पगारवाढ या पैशांशी संबंधिक अनेक शब्दांचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 18, 2025, 12:44 PM IST
Salary Hike 2025: यंदाच्या वर्षी तुमचा पगार किती टक्क्यांनी वाढणार? सर्वाधिक नफा कोणाचा?
Salary Hike 2025 Indian companies to give 6 to 15 percent salary hikes know the detailed report

Salary Hike 2025: पगारवाढीची (increament) चिंता प्रत्येक नोकरदार व्यक्तीला सतावत असते. वर्षभर आपण ज्या संस्थेसाठी काम करतो, ज्या संस्थेला कायम प्राधान्यस्थानी ठेवतो तिथं कामाच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या पगारासमवेत वर्षाकाठी होणारी पगारवाढ म्हणजे कामाची पोचपावतीच असते. भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रानुसार आणि त्या क्षेत्रातील नफ्याच्या निकषांनुसार पगारवाढ केली जाते. वाढत्या महागाईचा आकडाही आता बहुतांश संस्था अंदाजात घेत त्याचनुसार पगारवाढ लागू करताना दिसतात. 

मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मात्र जागतिक आर्थिक मंदीच्या सावटामुळं अनेकांनाच पगारवाढीच्या नावावर निराशेचा सामना करावा लागला आहे. त्यात आता यंदाच्या वर्षी नेमकं काय होणार, पगारात किती टक्क्यांनी वाढ होणार? हाच प्रश्न नोकरदार वर्ग विचारताना दिसत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये साधारणपणे बहुतांश कंपन्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. जिथं वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल हे स्पष्ट होतं. यंदाच्या वर्षीसुद्धा हे सत्र पाहायला मिळणार असून, स्पेशलाइज्ड स्किल्स (Specialized Skills) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याची चिन्हं आहेत. 

किमान ते कमाल टक्केवारीत होणार पगारवाढ 

मायकल पेज (Michael Page) च्या '2025 सॅलरी गाईड' रिपोर्टनुसार यंदाच्या वर्षी भारतीय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये 6 ते 15 टक्क्यांची पगारवाढ अपेक्षित आहेत. पण, एखाद्या विशिष्ट हुद्द्यावर आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अर्थात SKILLED PROFESSIONAL म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र तब्बल 30 ते 40 टक्के पगारवाढ मिळण्याचीही शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

भारतात यंदा बँकिंग, फायनान्स सर्विस, इन्श्योरन्स, रिस्क मॅनेजमेंट, कंम्प्लायन्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांना पगारवाढीच्या बाबतीत सुगीचे दिवत आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

पगारवाढीत सर्वात जास्त फायदा कोणाचा? 

राहिला प्रश्न कोण ठरणार लाभार्थी? तर प्रोफेशनल्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), मशीन लर्निंग (ML), सायबर सिक्योरिटी (Cyber security), डेटा प्राइवेसी (Data Privacy) अशा क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे त्याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मुख्य हुद्द्यांवर काम करणाऱ्यांनाही घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा : टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा

 

नोकरीच्या ठिकाणी विविधता आणि सर्वसमावेशतता (Diversity & Inclusion) या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं जात असून, महिलांना योग्य त्या संधी मिळत असून, यामध्ये त्यांचा 50 टक्के वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात यंदाच्या वर्षी भारतात बहुतांश क्षेत्रांमध्ये सरासरी 9 ते 11 टक्के इतकी पगारवाढ होणार आहे.