RBI on Sovereign Gold Bond Scheme : सोन्याने विक्रमी दर गाठला आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचे भाव 85 हजारच्या पुढे गेले आहेत. तर, चांदीचा दरही 93 हजार 900 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचला. यामुळे सोनं खरेदी सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यातच सोन्यात गुंतवणुक करणाऱ्या सर्वसामान्यांना जबरदस्त झटका देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची सुवर्ण योजना - सॉवरेन गोल्ड योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणुक करणाऱ्यांना स्वस्त दरात सोनं खरेदी करता येत होते. मात्र, आता हा देखील पर्याय आता उरलेला नाही.
रिझर्व्ह बँकेची सॉवरेन गोल्ड बाँड योजना ही चांगलीच लोकप्रिय होती. अनेकांनी या योजनेत गुंकवणुक करत स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याचा लाभ घेतला. आता मात्र, ही योजनाच सरकारने बंद केली आहे. यामुळे कमी दरात सोनं खरेदी करण्याचे सर्व पर्याय संपले आहेत. यामुळे सर्वसामान्यांसाठी सोनं खरेदी आणि सोन्यातील गुंतवणुकीसाठी असलेला सर्वेत्तम पर्याया देखील आता शिल्लक राहिलेला नाही.
भारत सरकारने 2015 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळाली. आरबीआयच्या वेबसाइटनुसार या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 8 वर्षे होती. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा निश्चित व्याजदर 2.5 टक्के इतका होता. याशिवाय, 8 वर्षांत सोन्याच्या किमतीत कितीही वाढ झाली तरी. त्यालाही तोच फायदा मिळाला असता. एसजीबी अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर होता. मात्र, जर मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला असेल तर भांडवली नफा करमुक्त असायचा.
सोन्याच्या किमती गगनाला भिडत असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत लोकांना स्वस्त सोने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली सॉवरेन गोल्ड बाँड योजना बंद करण्यात आली आहे. आता सॉवरेन गोल्ड बाँडचा कोणताही नवीन हप्ता येणार नाही. आधीच आलेले जुने हप्ते मुदतपूर्तीपर्यंत राहतील. सॉवरेन गोल्ड बाँड योजना बंद केल्यानंतर गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंडचा पर्याय असणार आहे.