मुंबई : उत्तर मध्य रेल्वेने (NCR) झांसीमध्ये ट्रेड अप्रेंटाइससाठी एकूण 480 पदे भरती केली जात आहेत. ही भरती फिटर (गॅस आणि इलेक्ट्रिक), मेकॅनिक (DSL), सुतार, इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2021 आहे. या प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. ही भरती दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे होईल. गुणांच्या आधारे गुणवत्तेची यादि तयार केली जाईल आणि गुणवत्तेच्या आधारेच निवड केली जाईल.
पात्र उमेदवार mponline.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराची नोंदणी apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर करावी लागेल.
उमेदवार मान्यता प्राप्त संस्था किंवा बोर्डमधून 50% मार्कांनी 10वी ची परीक्षा पास झालेला आसावा. तसेच वरील दिलेल्या ट्रेडमधून ITI सर्टिफिकेट (NCVT) प्राप्त असला पाहिजे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे.
5 मार्च 2021 पासूनचे उमेदवाराचे वय पकडले जाईल. जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी तीन वर्षांची सवलत, SC/CT उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात येईल.
या पदासाठी अप्लाय करण्यासाठी जनरल क्लासच्या उमेदवारांना 170 रुपये फी तर, ST,SC आणि महिलांसाठी 70 रुपये फी भरावी लागेल.
या संकेत स्थळावर घ्या संपूर्ण माहिती
http://mponline.gov.in//Quick%20Links/Documents/RailDoc/Jhashi/Rulebook_...