Girl Died After Eating Cake: वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. हा दिवस साजरा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो. लहान मुलं तर या खास दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढदिवस म्हटलं की केक, फुगे, सगळ्यांच्या शुभेच्छा त्याचबरोबर मिळणारे गिफ्ट याचे लहान मुलांना आकर्षण असते. मात्र एका 10 वर्षांच्या मुलीसोबत खूप दुखः घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या मृत्यून घरावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
पंजाबच्या पटियालातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबातील अन्य 4 जणांचीदेखील तब्येत बिघडली आहे. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी केक शॉपच्या मालकाविरोधात केस दाखल केली आहे. तर, मुलीच्या पालकांनी न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
पंजाब पोलिस अधिकारी गुरमीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी पटियालातील अमन नगर येथील रहिवासी काजल यांनी पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, 10 वर्षांच्या मानवीचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसासाठी संध्याकाळी 6 वाजता एका कंपनीतून ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. 6.30 वाजता हा केक घरी डिलिव्हर करण्यात आला. तर, सव्वा सातच्या सुमारास केके कापण्यात आला.
केक कापून झाल्यानंतर कुटुंबीयांनी तो मानवीला भरवला व स्वतःही खाल्ला. मात्र त्यानंतर सदस्यांची तब्येत बिघडायला लागली. त्यांना उलट्या व्हायला लागल्या. त्यानंतर रात्री मानवी झोपायला गेली. मात्र सकाळी उठून बघितले तर मानवीचे शरीर थंड पडले होते. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पंजाब अधिकारी गुरमीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तक्रार सापडली की केक खाल्ल्याने मुलीचा केक खाल्ल्याने मृत्यू झाला. केकमध्ये विषारी पदार्थ असू शकतो, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच, घरातून केकचे तुकडे एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. तसंच, बेकरी दुकानाच्या मालकाविरोधात आयपीसी कलम 273 आणि 304 अंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पटियालाच्या सिव्हिल सर्जनकडून संबंधित दुकानातून काही सँपलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.