मुंबई : पेट्रोलचे दर रविवारी 20 पैशांनी तर डिझेल दर 18 पैसे प्रति लीटरने कमी झाले आहेत. सलग 29 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ही कपात पाहायला मिळतेय. ऑगस्टच्या मध्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत खूप मोठी वाढ झाली आणि यावर राजकारण सुरू झालं. 18 ऑक्टोबर नंतर या किंमतीत घट सुरू झालंय. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर अचानक झालेली दरवाढ आता जवळजवळ संपलीच आहे. डिझेलचे दर कमी होण्याचा वेग थोडा कमी आहे.
डिेझेलच्या आंतरराष्ट्रीय दरात या दरम्यान कमी घट झालेली पाहायला मिळाली.
तेलाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात असे भाकित एंजेल ब्रोकिंग हाऊसचे उर्जा विषयक विशेषज्ञ अनुज गुप्ता यांनी केलंय. तेल उत्पादक प्रमुख देश असलेला सौदी अरब देश तेलाच्या निर्यातीत कपात करणार आहे.
डिसेंबरमध्ये तेलाची निर्यातीत प्रतिदिन पाच लाख बॅरलने घट होऊ शकते असे सौदी अरबच्या उर्जा मंत्र्यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचेही त्यांच्या उर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले.