Red Sky: निळं नाही तर लाल रंगाचं आकाश, वैज्ञानिकही चक्रावले

तूम्ही कधी लाल रंगाचं आकाश पाहिलं आहे का ? असा प्रश्न जर तूम्हाला विचारला तर तूम्ही नाही असेच उत्तर द्याल. मात्र तसे अजिबात नाही आहे. कारण या देशात लाल रंगाचे आकाश आले आहे. हा रंग पाहून नागरीक घाबरले आहेत, तर वैज्ञानिकांनाही या लाल रंगाच्या आकाशा मागचे गुढ उकळण्यात अपयश आले आहे.  

Updated: May 9, 2022, 09:36 PM IST
Red Sky: निळं नाही तर लाल रंगाचं आकाश, वैज्ञानिकही चक्रावले  title=

तूम्ही कधी लाल रंगाचं आकाश पाहिलं आहे का ? असा प्रश्न जर तूम्हाला विचारला तर तूम्ही नाही असेच उत्तर द्याल. मात्र तसे अजिबात नाही आहे. कारण या देशात लाल रंगाचे आकाश आले आहे. हा रंग पाहून नागरीक घाबरले आहेत, तर वैज्ञानिकांनाही या लाल रंगाच्या आकाशा मागचे गुढ उकळण्यात अपयश आले आहे.  

चीनच्या झोउशानच्या शहरात अचानक आकाश लाल झाले आहे. जणू काही रक्तरंजित खेळ सूरू असल्याचे नागरीकांना वाटत होते. हा नजारा अनेकांनी आपल्या कॅमेरात कैद केला. तर अनेकांनी या संबंधित फोटो सोशल मीडीयावर शेअर केले होते. हे व्हिडीओ आणि फोटो पाहून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

सोशल मीडीयावर काही युजर्स या घटनेला सूंदर नजारा असे म्हटले. तर अनेकांनी या घटनेवर भीतीदायक इमोजी वापरली.  2017 मध्ये जपानी अभ्यासाचाही उल्लेख करण्यात आला होता, ज्यामध्ये 1770 मध्ये मोठ्या सौर क्रियाकलापांमुळे अनेक देशांनी लाल आकाश अनुभवले असल्याचे सांगितले. 

मच्छिमारांनी उलगडले रहस्य 

या संदर्भातील बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्यानंतर या घटने मागचा शोध लावण्याचा प्रयत्न सूरू झाला. या संदर्भात एका मच्छीमाराशी बातचीत केल्यानंतर रहस्य उलगडले.

आकाशातील लाल प्रकाश हा त्यांच्या बोटीवरील लावलेल्या लाल दिव्यांचा होता. आकाशात धुक्याचे दाट आवरण असल्याने या धुक्यात हा रंग मिसळला. त्यामुळे आकाश काहीसे लाल रंगाचे दिसत होते. आणि अशाप्रकारे रहस्यमय लाल आकाशाच गुढ उकललं.