ओरिसा : भारत देश प्रगती करत असला तरी अजूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकला आहे. कारण देशाच्या अनेक भागातून अंधश्रद्धेमुळे घडलेल्या घटना दररोज समोर येत आहेत.आता या घटनेतही घरात सूरू असेलेले वाद संपविण्यासाठी सासरच्यांनी सूनेला मांत्रिकाकडे पाठवले होते. मांत्रिकाने या गोष्टीचा फायदा घेत सुनेवर 79 दिवस अत्याचार केला. दरम्यान सूनेने दाखवलेल्या चलाखीमुळे ही घटना उघडकीस आली आणि महिलेची मांत्रिकाच्या तावडीतून सूटका झाली.
ओरिसाच्या बालेश्वर जिल्ह्यातील एका कुटूंबात सूनेमुळे घरात मोठे वाद होत होते.दररोज हे वाद वाढतही चालले होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी सासूने मांत्रिकाचा सहारा घेतला होता. सासू आपल्या सूनेला मांत्रिकाकडे सोडून आली. यानंतर मांत्रिकाने सूनेला आणि तिच्या मुलाला डांबून ठेवत सलग ७९ दिवस तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. लग्नानंतर महिलेला हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. यातून महिलेचे आणि सासरच्यांमध्ये खटके उडत होते. यावर तोडगा काढण्यासाठी सासरच्यांनी एका मांत्रिकाचा सहारा घेतला.
मात्रिकाने या संधीचा फायदा घेत, त्या महिलेला थोडे दिवस आपल्यासोबत राहण्यासाठी पाठवावे लागेल अशी अट घातली. सासरच्या मंडळींनी ही अट मान्य केली. महिलेला पाठवण्यास तयार झाले पण त्या महिलेने जाण्यास नकार दिला होता.
मात्र सासरच्या मंडळींना महिलेच्या जेवनात बेशुध्दचे औषध टाकून त्या महिलेला मांत्रिकाच्या हवाली केले. त्या महिलेसोबत तिचा अडीच वर्षाचा मुलगाही होता. या मंत्रिकाने महिलेला एका खोलीत डांबून ठेवले. मांत्रिक महिलेवर ७९ दिवस अत्याचार करत होता, असा आरोप महिलेने केला आहे.