Big News: सहायक प्राध्यापक पदासाठी NET ची गरज नाही, यूजीसीचा मोठा निर्णय

Assistant Professor Guideline: विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सहायक प्राध्यापक पदांवर भरतीसंदर्भात नवा ड्राफ्ट जारी केला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 7, 2025, 08:02 PM IST
Big News: सहायक प्राध्यापक पदासाठी NET ची गरज नाही, यूजीसीचा मोठा निर्णय title=
यूजीसी नियम
Assistant Professor Guideline: विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सहायक प्राध्यापक पदांवर भरतीसंदर्भात नवा ड्राफ्ट जारी केला आहे. यानुसार एमई आणि एमटेक उमेदवारांना नेट क्वालिफाइड करण्याची गरज नसेल. कुलगुरुंच्या पदभरती संदर्भातील नियमात बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शैक्षणिक संस्थांतील भरती, प्रमोशन आणि व्हीसी भरतीसंदर्भात गाईडलाइन्स जारी केले आहेत. 
 
यूजीसीने जारी केलेल्या ड्राफ्टनुसार, किमान 55 टक्के गुणांसह मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी (एमटेक) मध्ये पीजी डिग्री असलेल्यांना थेट सहायक प्राध्यापक भरतीची परवानगी मिळणार आहे. यासाठी त्यांना नेट क्वालिफाइड होण्याची आवश्यकता नसेल. उमेदवारांना त्यांच्या सर्वोच्च शैक्षणिक कौशल्याच्या आधारे शिकवण्याची परवानगी देण्यासाठी UGC द्वारे नियम तयार केले जात आहेत. यानुसार आता कोणत्याही विषयात यूजी आणि पीजीचे शिक्षण घेतलेले पण पीएचडी किंवा नेट विषय असलेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. उदाहरणार्थ, रसायनशास्त्रात पीएचडी असलेला उमेदवार, गणितात बॅचलर पदवी आणि भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार रसायनशास्त्र शिकवण्यासाठी पात्र आहे. त्याचप्रमाणे यूजी, पीजी व्यतिरिक्त इतर विषयात त्यांची पहिली राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नेटसाठी अर्हता प्राप्त करु शकतात. 

कुलगुरूंसाठी नवे नियम 

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी उमेदवाराला 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक नाही. संबंधित क्षेत्रात 10 वर्षे काम केलेले आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले क्षेत्रतज्ज्ञ या पदासाठी पात्र असतील, तर आतापर्यंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ आवश्यक होता.

नेट आणि पीएचडी विषयांमधून करू शकता अर्ज 

नेट विषयांमध्येही सूट देण्यासाठी यूजीसीने मसुदा तयार केला आहे. म्हणजे नेट परीक्षेचा विषय जरी यूजी आणि पीजीपेक्षा वेगळा असला तरी संबंधित विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचा पीएचडी विषय यूजी आणि पीजी विषयांपेक्षा वेगळा असेल तर ते पीएचडी विषयांमधून प्राध्यापक होऊ शकतात. यासाठी यूजी आणि पीजीमध्ये संबंधित विषय अनिवार्य असणार नाहीत, असे  यूजीसीने तयार केलेल्या मसुद्यात म्हटले आहे. 

समान विषयाची अट नाही

सहाय्यक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीसाठी उमेदवारांना पीएचडी पदवी असणे अनिवार्य असेल. या पदवीशिवाय उमेदवारांना पदोन्नती मिळू शकणार नाही. आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी पीजी आणि नेटचे विषय समान असायला हवे होते, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पीजी आणि नेटचा एकच विषय असायला हवा होता, मात्र आता त्याची गरज भासणार नाही.