मदरशांना हायकोर्टाचा दणका, राष्ट्रगीत गाण्यापासून सूट नाहीच

मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे.

Updated: Oct 4, 2017, 07:08 PM IST
मदरशांना हायकोर्टाचा दणका, राष्ट्रगीत गाण्यापासून सूट नाहीच

अलाहाबाद : मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता मदरशांसाठी राष्ट्रगीत बंधनकारक झाले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. हायकोर्टाने मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान असंवैधानिक कर्तव्य आहे, असे हायकोर्टाने पुढे म्हटले आहे.

यापूर्वी १५ ऑगस्टला मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि तिरंगा फडकावण्याचा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्याचे चित्रिकरणही करावे अशा उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाबाबत वाद निर्माण झाला होता.