मुंबई : लहान मुलांना आपण देवाघरची फुलं म्हणतो. त्यांच्या इतकं निरागस कोणीही या जागात नाही. त्यांच्या निरागसतेची आणि प्रेमाची तुलना कशातच होऊ शकत नाही. काही मुलं जन्मापासूनच खूपच समजदार असतात. तर काही मुलं ही इतकी खट्याळ आणि मस्तीखोर असतात की, ते कोणाचंच एकत नाही. आपला बऱ्याचदा हा समज असतो की, मुलं ही लहान असतात म्हणून त्यांना काहीही कळत नाही किंवा ते जबाबदारी घेऊ शकत नाही. परंतु सगळ्याच मुलांच्या बाबतीत असं होतं नाही. काही मुलं आपल्या परिस्थितीमुळे इतकी मोठी होतात की, ते आपल्या वयापेक्षा जास्त समजूतदार होतात.
याचंच एक उदाहरण मणिपूरमधून समोर आलं आहे. जिथे एक तरुणी आपल्या लहान बहिणीला मांडीवर घेऊन शाळेत पोहोचली. आता त्याचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
या मुलीचे वयही जास्त नाही, ती सुमारे 10 वर्षांची आहे आणि ती चौथीत शिकते. ती आपल्या बहिणीवर इतका प्रेम करतो की, तिला घरी सोडण्याऐवजी तो तिला आपल्यासोबत शाळेत घेऊन आला.
या मुलीचा व्हायरल होणारा हा फोटो बरंच काही बोलतो. या फोटोमुळे मुलीचे अभ्यासावरचे प्रेम दिसून येते. एवढेच नाही तर तिला आपल्या जबाबदारीचीही जाणीव आहे. हे दाखवून देते. हा फोटो मणिपूरचे ऊर्जा, वन आणि पर्यावरण मंत्री बिस्वजित सिंह यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे - "या मुलीचे अभ्यासाबाबतची ओढ आणि जिद्द मला थक्क करून गेली. ही १० वर्षांची मुलगी चौथीच्या वर्गात आहे. तिचे नाव मेनिंगसिनलिव्ह पाल्मेई आहे, जी मणिपूरमधील तैमेन्ग्लॉन्ग येथील आहे. आई-वडील शेतात काम करत असल्याने ती तिच्या लहान बहिणीला हातात घेऊन शाळेत पोहोचली."
Her dedication for education is what left me amazed!
This 10-year-old girl named Meiningsinliu Pamei from Tamenglong, Manipur attends school babysitting her sister, as her parents were out for farming & studies while keeping her younger sister in her lap. pic.twitter.com/OUIwQ6fUQR
— Th.Biswajit Singh (@BiswajitThongam) April 2, 2022
बिस्वजित सिंग यांनी तो फोटो तर शेअर केलाच, पण त्याने मुलीच्या पालकांशी संपर्क साधून तिला इम्फाळला बोलावले. येथे ते या मुलीच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासाची व्यवस्था करतील असे त्यांनी सांगितले. सध्या ही मुलगी दलाँग प्राथमिक शाळेत शिकत आहे. केवळ मंत्रीच नाही, तर इंटरनेटवरील या फोटोने अनेक लोक अवाक झाले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.