मंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण

भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे. 

Updated: Jun 19, 2017, 09:48 AM IST
मंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण title=

नवी दिल्ली : भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे. 

मंगळयान मोहिमेचे मंगळ ग्रहाभोवती फक्त 180 दिवसांकरता नियोजन केले गेले होते. मात्र प्रत्यक्षात 1000 दिवस मंगळयान कार्यरत राहिले आहे. 
5 नोव्हेंबर 2013 ला पृथ्वीवरुन इस्त्रोने मंगळयान प्रक्षेपित केले होते. 

तब्बल 10 महिने प्रवास करत 68 कोटी किलोमीटर अंतर पार करत मंगळयान 24 सप्टेंबरला 2014 ला मंगळयानच्या ग्रहाच्या कक्षेत यशस्वरित्या स्थिरावले होते. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी कऱणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

सध्या मंगळयान मंगळग्रहाभोवती सुमारे 471 किमी ते 76 हजार 990 किमी अशा दीर्घ वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करत आहे. गेल्या एक हजार दिवसांत मंगळयानाने मंगळग्रहाचा विस्तृत नकाशा तयार केला असून खनिजांबद्दलही माहिती मिळवीली आहे.