स्पर्धा परीक्षेत असे अनेक प्रश्न असतात जे ऐकून आपल्याला विश्वासच बसणार नाही, की आपल्या आजूबाजूला असही काही गोष्टी आहेत. भारत हे विविधतेने नटलेला देश असून इथे अनेक राज्यात अनेक वेगवेगळी शहरं आहेत. जिथे वेगवेगळ्या संस्कृती, जाती धर्माची लोक एकत्र नांदतात. भारतातील प्रत्येक राज्याची आपलं असं वैशिष्ट्य असून त्यामागे मोठा इतिहासही दडलेला आहे. भारतात असं एक राज्य आहे, जे एक नाही, दोन नाही तर तब्बल 8 राज्यांच्या सीमने वेढलंय. एवढंच नाही तर एका देशाची सीमाही या राज्याला जोडली गेलीय. तुम्हाला या राज्याबद्दल आणि त्याचं नाव माहितीये का?
होय! भारतातील हे एकमेव राज्य आहे ज्याच्या सीमा 8 राज्ये आणि एका देशाने वेढलं गेलंय. याचं उत्तर 99 टक्के लोकांना माहिती नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा परीक्षेत असे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर या प्रश्नाचे उत्तर सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचे आहे.
भारतातील या राज्याचे नाव उत्तर प्रदेश आहे. हे राज्य राजकारणापासून पर्यटन, खाद्यपदार्थ ते औद्योगिक अशा सर्वच बाबतीत जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील चौथ्या क्रमांकाचे राज्य असून ज्यांच्या सीमा दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आहेत या राज्याला जोडला गेलाय. तर नेपाळ या देशाची सीमाही उत्तर प्रदेशाला जोडला गेलाय.
उत्तर प्रदेशात गंगा, यमुना, सरयू, घाघरा आणि गोमती या पवित्र नद्या वाहतात. तर उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ आहे, ज्याला नवाबांचे शहर म्हटलं जातं. जे चिकनकारी भरतकामासाठी प्रसिद्ध आहे. हे राज्य प्राचीन काळापासून वैदिक धर्माचे केंद्र आहे. जगातील सर्वात जुने शहर वाराणसी इथे आहे. जिथे भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते. शिवाय, राज्य कुंभमेळा आणि संगम बीचसाठी प्रसिद्ध आहे. त्यात बनारस हिंदू विद्यापीठ (BHU), अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), लखनौ विद्यापीठ, IIT आणि IIM सारख्या प्रमुख संस्था आहेत.
जर तुम्ही हे राज्य पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ताजमहाल, काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्या, मथुरा-वृंदावन, झाशी, लखनौ शहराला भेट देऊ शकता. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.