रेल्वे तिकीट बुकींगवर दुप्पट फायदा, आयआरसीटीसीची नवी योजना

या रिवॉर्ड पाँईट्सचा उपयोग व्यवहाराच्या पुढील ३ वर्ष करु शकता.

Updated: Apr 4, 2019, 05:20 PM IST
रेल्वे तिकीट बुकींगवर दुप्पट फायदा, आयआरसीटीसीची  नवी योजना title=

मुंबई : लाबं पल्ल्याच्या प्रवाशासाठी नेहमीच रेल्वे प्रवासाला पंसती दिली जाते. प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी रेल्वे नेहमीच सवलत देत असते. अशाच एका प्रकारची नवी योजना आयआरसीटीसीने आणली आहे. या योजनेचा लाभ केवळ वरिष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. या योजनेनुसार वरिष्ठ नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढल्यास त्यांना दुप्पट फायदा होणार आहे.

भारतीय रेल्वे वरिष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत देत असते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी असलेली वयाची अट पू्र्ण केलेल्या पुरुषांना रेल्वे प्रवासात 40 तर महिलांना 50 टक्के सवलत दिली जाते. विशेष म्हणजे ही सवलत प्रत्येक दर्जासाठी दिली जाते. परंतू आता या योजनेनुसार रेल्वेने वरिष्ठ नागरिकांना आणखी फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेचं स्वरूप

रेल्वे प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिंकासाठी रेल्वेने नवी योजना सुरु केली आहे. या योजनेला लॉयल्टी प्रोग्रॅम असे नाव देण्यात आले आहे.  आपण शॉपिंग दरम्यान डेबिट-क्रेडीट कार्डचा वापर केल्यानंतर आपल्याला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या पॉइंटचा उपयोग जर रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी केल्यावर तिकीटात सवलत मिळेल. या पॉईंट्सची किंमत ही किमान २५ पैसे तर अधिक १ रुपये या दरम्यान असते. 

 

 

वरिष्ठ नागरिकांना रेल्वेकडून तिकीटावर सवलत मिळते. तसेच या रिवॉर्ड पॉईंटच्या मदतीने तिकीट बुक केल्यास त्यांना आणखी सवलत मिळेल. फक्त यासाठी एक अट आहे. ती म्हणजे तिकीट बुक करणाऱ्या त्या व्यक्तीकडे आयआरसीटीसीचे प्लेटिनम एसबीआय कार्ड असायला हवे. 

योजनेचा फायदा

या योजनेनुसार वरिष्ठ नागरिकांनी आयआरसीटीसीच्या प्लेटिनम कार्डद्वारे एसी कोचचे तिकीट बुक केल्यास, रिवॉर्ड पॉईंट्स म्हणून तिकीटच्या रक्कमेच्या १० पट रकम ही मिळेल. तसेच इतर फायदे देखील मिळतील. रिवॉर्ड पाँइट्स केवळ एसी कोचचे तिकीट बुक केल्यावरच मिळतील. या रिवॉर्ड पाँईट्सचा उपयोग व्यवहाराच्या पुढील ३ वर्ष करु शकता. यासाठी दरवर्षी या सदस्यत्वाचे नुतणीकरण करणे गरजेचे राहणार आहे. 

रिवॉर्ड पाँईट्स मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जास्त काही करण्याची गरज नाही. त्यांना केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाईट वर जायचे आहे. यावर आपल्या अकाउंटने लॉगईन केल्यावर आवश्यक माहिती द्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे, त्या ठिकाणचा रेल्वेचा शोध घ्यायचा आहे. ते केल्यानंतर तिकीट दर या पर्यायावर जाऊन आपली तिकीट बुक करुन घ्यायची. तिकीट बुक केल्यानंतर 'रिडमिशन रेडिओ' या बटनावर क्लिक केल्यावर तिकीट कनफॉर्म बटन दाबून प्रक्रिया पुढे सुरु ठेवावी लागणार आहे.  वरील सर्व प्रक्रिया पूर्ण  केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रिवॉर्ड पाँईट जमा होतील.